अ‍ॅपशहर

जळगावात तरुणीवर सामूहिक बलात्कार

अहमदाबाद येथून नाशिक व तेथून जळगावी रेल्वेने येत असलेल्या बावीसवर्षीय तरुणीवर रेल्वेत आणि त्यानंतर जळगाव शहरात जुन्या निमखेडी रोडवर नेऊन तिघांनी बलात्कार केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.

Maharashtra Times 29 Aug 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rape on girls at jalgaon
जळगावात तरुणीवर सामूहिक बलात्कार


अहमदाबाद येथून नाशिक व तेथून जळगावी रेल्वेने येत असलेल्या बावीसवर्षीय तरुणीवर रेल्वेत आणि त्यानंतर जळगाव शहरात जुन्या निमखेडी रोडवर नेऊन तिघांनी बलात्कार केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.

तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ती अहमदाबाद (गुजरात) येथून रेल्वेने जळगावला आली. येथून पुन्हा नाशिक, देवळाली कॅम्प येथे जाण्यासाठी बरेली एक्स्प्रेसमध्ये बसली असताना टीसीने तिला तिकिटाची विचारणा केली. मनमाड स्थानकावर उतरल्यावर रेल्वेतील वेंडरशी तिची ओळख झाली. परंतु, ती पवन एक्स्प्रेसने जळगावला आली. जळगाव रेल्वेस्थानकावर रविवार (दि. २७) रोजी रात्री आठ वाजता रेल्वे वेंडर याने स्टेशनवर सोडल्यावर तो त्याच्या घरी पाळधी येथे निघून गेला. रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर समोर शहर पोलिस चौकीजवळील रिक्षा स्टॉपवर उभे असलेला रिक्षाचालक व त्याच्या सोबतच्या दोघांनी तिला रिक्षात सोबत घेवून जात सुरत रेल्वेगेट जवळील मालधक्क्यावर नेऊन अत्याचार केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज