अ‍ॅपशहर

वाचन प्रेरणेतून डॉ. कलाम यांना आदरांजली

के. सी. ई. सोसायटी संचालित गुरूवर्य प. वि. पाटील विद्यालयात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Maharashtra Times 17 Oct 2018, 4:00 am
शहरात ठिकठिकाणी उपक्रमांचे आयोजन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम reading inspiration day celebrates program in jalgaon city colleges and schools
वाचन प्रेरणेतून डॉ. कलाम यांना आदरांजली


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

के. सी. ई. सोसायटी संचालित गुरूवर्य प. वि. पाटील विद्यालयात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी वाचनातून आपले यश गाठावे यासाठी त्यांचा जन्मदिन हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यात विद्यार्थ्यांनी दोन तास सलग गोष्टी, गाणे यांसह विविध विषयांची पुस्तके वाचन केली. अब्दुल कलाम हे एक सर्वसमावेशक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. आपल्या वैज्ञानिक विचारांनी त्यांनी जगावर छाप टाकली, अशा शब्दांत उपशिक्षक कमलेश वंजारी यांनी महती पटवून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश भालेराव यांनी केले तर आभार दीपाली चौधरी यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
व. वा. वाचनालय
शहरातील व. वा. वाचनालयात राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने ‘पुस्तक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील दहा ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील १० ठिकाणी पुस्तकांची दालने सुरू करून तेथे मोफत वाचनाची सुविधा देण्यात आली आहे. महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते उपक्रमास सुरुवात करण्यात आली. या वेळी ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, अॅड. सुशील अत्रे, डॉ. मनीष जोशी, शिल्पा बेंडाळे, प्रभात चौधरी, ग्रंथपाल अनिल अत्रे उपस्थित होते.

अध्यापक विद्यालय
केसीई सोसायटीचे अध्यापक विद्यालयात प्राचार्य डॉ. ए. आर. राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. या वेळी विभागप्रमुख प्रा. दुष्यंत भाटेवाल, प्रा. केतन चौधरी, प्रा. एच. टी. चौधरी, प्रा. एस. व्ही. झोपे, प्रा. एस. एस. तायडे, प्रा. एस. एम. पाटील, डॉ. डी. एस. पवार, प्रा. किसन पावरा, जयश्री तळेले उपस्थित होते. या वेळी मनीष बागूल, गायत्री झांबरे, नेहा पाटील, वैशाली राजपूत, सुवर्णा सूर्यवंशी आदींनी अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयीची माहिती व ‘डॉ. कलाम यांची दशसूत्री’ या पुस्तकाचे वाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

पत्रकारिता विभाग
मू. जे. महाविद्यालयाच्या जनसंज्ञापन आणि वृत्तविद्या विभागातर्फे वाचन प्रेरणा दिन आणि राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात वृत्तपत्र विक्रेते रामचंद्र वाणी यांचा विद्यार्थिनी प्रियंका अहिरे हिच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी विभागप्रमुख प्रा. विश्वजीत चौधरी उपस्थित होते. या वेळी प्रा. प्रशांत सोनवणे, केतकी सोनार उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज