अ‍ॅपशहर

‘पेट’चे शुल्क कमी करा

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या पुन्हा नियुक्तीचा निर्णय लवकर व्हावा, पीएच. डी. परीक्षेसाठी देण्यात येणाऱ्या पेट परीक्षेचे शुल्क कमी करावे तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्याचा खर्च विद्यापीठाने करावा यांसारख्या मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चा व भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे नुकतेच कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांना निवेदन देण्यात आले.

Maharashtra Times 18 Jun 2017, 1:20 pm
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम reduce the amount of ph d entrance test
‘पेट’चे शुल्क कमी करा

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या पुन्हा नियुक्तीचा निर्णय लवकर व्हावा, पीएच. डी. परीक्षेसाठी देण्यात येणाऱ्या पेट परीक्षेचे शुल्क कमी करावे तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्याचा खर्च विद्यापीठाने करावा यांसारख्या मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चा व भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे नुकतेच कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांना निवेदन देण्यात आले.

विद्यापीठात वर्षभर काम केल्यानंतर उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या सुटीत मात्र यांना वेतन दिले जात नाही. सोबतच पुढील वर्षी पुन्हा आपल्याला नोकरी मिळेल की याबाबत शंका असते. त्यामुळे कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्यांचा पुन्हा नियुक्तीचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा. पीएच. डी. साठी आवश्यक असणाऱ्या पेट परीक्षेचे शुल्क इतर विद्यापीठांप्रमाणे कमी आकारण्यात यावे, या मागण्या केल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज