अ‍ॅपशहर

जिल्ह्यात हरित सेना सदस्यांची नोंदणी

शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत ४ कोटी वृक्षलागवड करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, जिल्ह्यात ५० हजार हरित सेना सदस्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असल्याची माहिती जळगाव वनविभागाचे आदर्शकुमार रेड्डी व यावल वन विभागाचे उपवन संरक्षक संजय दहिवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Maharashtra Times 23 Jun 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम registration of harit sena in jalgaon district
जिल्ह्यात हरित सेना सदस्यांची नोंदणी

शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत ४ कोटी वृक्षलागवड करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, जिल्ह्यात ५० हजार हरित सेना सदस्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असल्याची माहिती जळगाव वनविभागाचे आदर्शकुमार रेड्डी व यावल वन विभागाचे उपवन संरक्षक संजय दहिवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वृक्षलागवड कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी नागरी संस्था, सेवाभावी संस्था यांनी हरित सेना सदस्य म्हणून नोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणी केलेल्या सदस्यांना रोप पुरवठा प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जातील. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

इयत्ता ५ वीवरील विद्यार्थ्यांसह सर्व नागरिक नोंदणी करू शकतात. २५ जूनपर्यंत नोंदणी झालेल्या नागरिकांना / संस्थांना त्यांच्या मागणीनुसार वृक्ष लागवडीसाठी सशुल्क रोपे पुरविण्यात येणार असून, ११५३ ग्रामपंचायतीत ३७५ रोपे प्रती ग्रामपंचायत मोफत पुरविण्यात येतील, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज