अ‍ॅपशहर

अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड

महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्यासाठी उद्या बुधवार (दि.११) शेवटचा दिवस आहे. यामुळे आज मंगळवारी देखिल भाजप, सेना, इतर पक्ष व अपक्षांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महापालिकेत गर्दी झाली होती.

Maharashtra Times 11 Jul 2018, 5:00 am
७६ उमेदवारांकडून १०६ अर्ज दाखल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम DSC_1643


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्यासाठी उद्या बुधवार (दि.११) शेवटचा दिवस आहे. यामुळे आज मंगळवारी देखिल भाजप, सेना, इतर पक्ष व अपक्षांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महापालिकेत गर्दी झाली होती.

प्रजासत्ताक लोकराज्य पक्षाचे उमेदवार तर ढोल ताशांच्या निनादात अर्ज भरण्यासाठी आले होते. बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी याद्या तयार असूनही राजकीय पक्षांनी त्या मंगळवारी जाहीर केल्या नाहीत. दरम्यान, मंगळवारी ७६ उमेदवारांनी १०६ अर्ज दाखल केले आहेत.

महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दि. ४ जुलैपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आज (दि. ११) दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. भाजप-शिवसेना युतीचा तिढा अद्याप सुटला नसल्याने दोन्ही पक्षांच्या अपवाद वगळता मातब्बर उमेदवारांनी अर्ज दाखल केले नाहीत. मात्र, इतरांनी मंगळवारी अर्ज दाखल केले. शिवसेना व भाजप नेत्यांच्या कार्यालयातून ज्यांना अर्ज भरण्याचे आदेश मिळत होते ते येऊन अर्ज दाखल करीत होते.

सकाळपासूनच पालिकेच्या सतरा मजली प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या व पाचव्या मजल्यावरील निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात इच्छुकांची अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली होती. शिवसेनेचे माजी उपमहापौर सुनील महाजन व त्यांच्या पत्नी, तसेच भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांच्यासह अनेक उमेदवारांनी अर्ज सादर केले. नामनिर्देशनपत्र भरण्यासाठीचा शेवटचा दिवस असल्याने आज महापालिकेत गर्दी होणार असल्याने नागरिकांनी प्रशासकीय कामासांठी दुपारी ४ वाजेनंतर यावे, असे आवाहन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी केले आहे.

१०६ उमेदवारी अर्ज दाखल
मनपा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असल्यामुळे मंगळवारी उमेदवारांनी अर्ज भरण्यास गर्दी केली होती. काही उमेदवारांनी परिवारासह येऊन तर काही उमेदवारांनी समर्थकांसह आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. एकूण १०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. भाजपतर्फे ३६, शिवसेनेतर्फे १७, राष्ट्रवादी ५, काँग्रेस २, भाकप १ तर अपक्ष ४५ अर्ज दाखल केले आहेत.

पक्षनिहाय दाखल अर्ज
पक्ष-एकूण अर्ज
भाजप-३६
शिवसेना-१७
राष्ट्रवादी-५
काँग्रेस-२
भाकप-१
अपक्ष-४५
एकूण -१०६

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज