अ‍ॅपशहर

जैन इरिगेशनमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस

जैन इरिगेशनच्या जैन प्लास्टिक, जैन फूड, जैन एनर्जी आणि जैन अॅग्री पार्क यांच्यासह भारतातील अन्य कारखान्यांमध्ये शनिवारी (दि. ४) राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त सुरक्षेविषयी जागृतीबाबत कंपनीत विविध उपक्रम राबविले गेले. मोबाइल व रस्ता सुरक्षा या संदर्भात कंपनीतील सहकाऱ्यांना यावर्षी माहितीपत्रके वाटण्यात आली. सकाळी कंपनीच्या सर्व आस्थापनांमध्ये सुरक्षा शपथ घेतली गेली.

Maharashtra Times 6 Mar 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम saftey day celebration at jain irrigation
जैन इरिगेशनमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस

जैन इरिगेशनच्या जैन प्लास्टिक, जैन फूड, जैन एनर्जी आणि जैन अॅग्री पार्क यांच्यासह भारतातील अन्य कारखान्यांमध्ये शनिवारी (दि. ४) राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त सुरक्षेविषयी जागृतीबाबत कंपनीत विविध उपक्रम राबविले गेले. मोबाइल व रस्ता सुरक्षा या संदर्भात कंपनीतील सहकाऱ्यांना यावर्षी माहितीपत्रके वाटण्यात आली. सकाळी कंपनीच्या सर्व आस्थापनांमध्ये सुरक्षा शपथ घेतली गेली.

सहकाऱ्यांना सुरक्षा उपकरणांची माहिती व्हावी यासाठी सुरक्षा उपकरणांचे प्रदर्शनदेखील भरविण्यात आले. कंपनीतील ज्येष्ठ महिला सहकारी सुलभा जोशी यांच्याहस्ते प्रदर्शनाचे उद््घाटन झाले. फायर सेफ्टी विभागाचे डी. जी. शितोळे यांनी या दिनाचे महत्त्व विशद केले. सुनील देशपांडे, सुनील गुप्ता, एस. बी. ठाकरे, जितेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज