अ‍ॅपशहर

विक्रीकर निरीक्षक परीक्षेत ढेरे प्रथम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १८१ पदांसाठी घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. यात दीपस्तंभ मनोबल केंद्रातील सागर सुभाष ढेरे हा दिव्यांग विद्यार्थी अपंग संवर्गातून राज्यात प्रथम आला आहे. तर अमळनेर येथील स्वप्नील वानखेडे हा विद्यार्थी ओबीसी संवर्गात राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

Maharashtra Times 18 Dec 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sagar there first in state sales inspector examination
विक्रीकर निरीक्षक परीक्षेत ढेरे प्रथम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १८१ पदांसाठी घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. यात दीपस्तंभ मनोबल केंद्रातील सागर सुभाष ढेरे हा दिव्यांग विद्यार्थी अपंग संवर्गातून राज्यात प्रथम आला आहे. तर अमळनेर येथील स्वप्नील वानखेडे हा विद्यार्थी ओबीसी संवर्गात राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

सागर ढेरे हा नगर जिल्ह्यातील लोहगाव येथील रहिवाशी असून, तो गेल्या वर्षभरापासून मनोबल केंद्रात स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन घेत होता. सागरला डाव्या डोळ्याने दिसत नाही तर उजव्या डोळ्याची दृष्टीही अतिशय क्षीण आहे. बारामती येथील भक्ती बाळासाहेब काय हिने १२९ गुणांसह महाराष्ट्रात मुलींमध्ये सातवा गुणानुक्रमांक मिळविला आहे. यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथील सतीश प्रकाश धनगर हा विद्यार्थी एकशे छत्तीस गुणांसह खुल्या प्रवर्गात सव्विसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. दीपस्तंभ धुळे केंद्राचा विद्यार्थी विवेक दगा साबळे हा विद्यार्थी खुल्या प्रवर्गात ५३ क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. जळगाव येथील मानसी सुरेश पाटील हिने १३३ गुणांसह मुलींमध्ये १७ वा क्रमांक पटकावला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोबल केंद्रातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज