अ‍ॅपशहर

‘सांबरी’ ने जिंकली प्रेक्षकांची मने

महावितरण आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेच्या उद्घाटनानतंर सादर करण्यात आलेल्या ‘सांबरी’ व ‘फेस टू फेस’ या नाटकांनी गुरुवारी (दि. २७) प्रक्षेकांची मने जिंकून घेतली. तत्पूर्वी छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

Maharashtra Times 28 Sep 2018, 5:00 am
महावितरण आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेचे उद्घाटन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम DSC_0442


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महावितरण आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेच्या उद्घाटनानतंर सादर करण्यात आलेल्या ‘सांबरी’ व ‘फेस टू फेस’ या नाटकांनी गुरुवारी (दि. २७) प्रक्षेकांची मने जिंकून घेतली. तत्पूर्वी छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

कर्मचाऱ्यांमधील कला जोपासण्यासाठी नाट्यस्पर्धा आवश्यक आहेत. प्रत्येकात कला गुण असतो. त्या गुणास जोपसणाऱ्यांची संख्या कमी असते. स्पर्धा ही कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना वाव देण्याची एक संधी असते, असे मत कुमठेकर यांनी व्यक्त केले. स्पर्धेतून आपल्या अभिनयातील उणिवा आपणास कळून येतात. नाटकाच्या रंगमंचावर प्रेक्षकांकडून मिळालेली दाद ही मनाला आनंद देऊन जाते. दैनंदिन जीवनाच्या रंगमंचावर काम करीत असताना आपल्या कामगिरीद्वारे महावितरण कर्मचारी वीजग्राहकांची दाद मिळवितो. त्यामुळे कामात उत्साह निर्माण होतो, असेही कुमठेकर म्हणाले.
याप्रसंगी मंचावर नांदेड परिमंडलाचे मुख्य अभियंता संतोष वाहणे, अधीक्षक अभियंता फारुख शेख, चंद्रशेखर मानकर, प्रकाश पौणिकर उपस्थित होते. तर परीक्षक म्हणून चंद्रकांत अत्रे, डॉ. हेमंत कुलकर्णी, शुभांगी पाठक यांची उपस्थिती होती. योगशिक्षिका डॉ. अनिता पाटील यांच्या समूहाने ‘योगगणेशवंदना’ सादर केली. प्रास्ताविक सहाय्यक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड यांनी केले. आभार अधिकारी अरुण शेलकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना पाटील यांनी केले.

जळगाव परिमंडळाच्या नाट्यसंघाने सादर केलेल्या पर्यावरण रक्षणासह अहिंसेचा संदेश देणाऱ्या ‘सांबरी’ने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. कर्मचारी कलांकारांच्या दर्जेदार सादरीकरणामुळे उपस्थित भारावले होते. या नाटकाचे दिग्दर्शन पराग चौधरी यांनी केले. या नाटकात मुकेश अहिरे, सचिन भावसार, दीपक कोळी, युगंधरा ओहोळ, संकेत राऊत, दिपाली सोनार, किशोर मराठे, प्रदीप भंगाळे, रवींद्र चौधरी, मोना बारेला, कमलेश भोळे, राजेंद्र आमोदकर ,पुनम थोरवे, उमेश गोसावी आदींनी भूमिका साकारली. बालकलाकार गोरक्ष कोळी याचाही यात सहभाग होता.

‘फेस टू फेस’ ने उत्कंठा वाढविली
नांदेड परिमंडळाच्या नाट्यसंघाने सादर केलेल्या नाटकाने शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा टिकवून ठेवली. चेहरा बदललेला नायक आपली मूळ ओळख पटवून देण्यासाठीचा खटाटोप करतो. मात्र, त्यावर विश्वास ठेवावा की नाही या द्विधा मनस्थितीतील नायिका प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळाली. या नाटकाचे दिग्दर्शन धनंजय पवार यांनी केले. या नाटकात प्रमोद देशमुख ,राजकुमार सिंदगीकर, ऋतुजा रत्नपारखी, सतीश निशाणकर, पूर्वा देशमुख आदींनी अभिनय केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज