अ‍ॅपशहर

सातपुड्यात कृष्णगरुडचे अस्तित्व मान्य

जळगावच्या वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पक्षी मित्रांना सातपुड्यात आढळलेल्या दुर्मिळ कृष्णगरुड (ब्लॅक ईगल) व वृक्षसर्पी (ट्री क्रीपर) या दोन्ही पक्षांची नोंद (संक्षिप्त शोधपत्र) इला फाऊंडेशन या आंतरराष्ट्रीय पत्रिकेत करण्यात आल्याची माह‌िती संस्थेचे सचिव बाळकृष्ण देवरे यांनी दिली.

Maharashtra Times 17 Jan 2017, 5:03 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम satpudya bird watch
सातपुड्यात कृष्णगरुडचे अस्तित्व मान्य


जळगावच्या वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पक्षी मित्रांना सातपुड्यात आढळलेल्या दुर्मिळ कृष्णगरुड (ब्लॅक ईगल) व वृक्षसर्पी (ट्री क्रीपर) या दोन्ही पक्षांची नोंद (संक्षिप्त शोधपत्र) इला फाऊंडेशन या आंतरराष्ट्रीय पत्रिकेत करण्यात आल्याची माह‌िती संस्थेचे सचिव बाळकृष्ण देवरे यांनी दिली.

वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अभ्यासकांद्वारे ८ वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील सातपुडा वनक्षेत्र आणि मुक्ताईभवानी व्याघ्र प्रकल्प चारठाणा या क्षेत्रातील जैवविविधता संशोधन आणि शास्त्रशुद्ध नोंदी घेण्याचे कार्य सुरू आहे. या संशोधनात दुर्मिळ पक्षी, सरिसृप, वनस्पती, वृक्ष कीटक, यांच्या नोंदी वन्यजीव संरक्षण संस्थेकडून घेतल्या जात आहेत.

वृक्षसर्पी (ट्री क्रीपर)
मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्पात चारठाणा वनक्षेत्रात प्रथम स्पॉटेड ट्री क्रीपर हा पक्षी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पथकाला आढळला होता. २ मे २०१५ रोजी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अमन गुजर, राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, रवींद्र सोनवणे यांना हा दुर्मिळ पक्षी आढळला. त्याचे छायाचित्र अमन गुजर यांनी टिपले. खान्देशातील हा पहिला फोटो ग्राफिक रेकॉर्ड असावा या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय पत्रिकेत नोंद करण्यासाठी संस्थेचे तांत्रिक विभाग प्रमुखपक्षी अभ्यासक अमन गुजर प्रयत्न करत होते. डॉ. सतीश पांडे यांच्या मार्गदर्शनाने त्याला यश आले आहे.

असा आहे वृक्षसर्पी
वृक्षसर्पी तसा तर भारतभर आढळ, पण दूर्मिळ. तपकीरी काळ्या पाठीवर पांढरे ठिपके. उठून दिसणारी पांढरी भूवई. पुस्तकातील नोंदीनुसार मध्य भारतात पूर्वी आढळत होता. खूपच कमी रेकॉर्ड व सध्या रेकॉर्ड नाही. भेगाळलेली साल असलेली खैरा सारखी झाडे आवडतात. कीटक, कोळी हे मूख्य खाद्य. सालीतील भेगांमध्ये लपलेले कीटक चोचीने काढून खोडावर आपटून मटकावतो.

ब्लॅक ईगल (कृष्णगरुड)
२७ ऑगस्ट २०१६ रोजी पाटणादेवी परिसरात अभ्यास दौराच्यावेळी ब्लॅक ईगल (कृष्ण गरुड) अमद गुजर यांना दिसला. त्यांनी त्याचे छायाचित्रही टीपले. यासाठी पाटणा देवी वनपरिक्षेत्र अधिकारी एल. एम. राठोड यांचे सहकार्य लाभले.

असा आहे कृष्णगरुड
कृष्णगरुडाचे पूर्ण काळे शरीर, मोठ्या आकाराचा, चोच आणि पाय पिवळे असल्याने लवकर ओळखला जातो. डोंगराळ भागात वास्तव्य करतो. उंदीर, बेडूक, साप, तसेच दुसऱ्या पक्षांची पिले, त्यांनी उबवलेली अंडी, लहान सस्तन प्राणी हे याचे भक्ष आहे.

सातपुड्यातील जैवविविधतेच्या शास्त्रशुद्ध नोंदी करून जगासमोर येणे गरजेचे आहे. अभय उजागरे यांच्या कार्याने प्रेरित होऊन आम्ही हे प्रयत्न करत आहोत.
-राहुल सोनवणे, वनस्पती आणि पक्षी अभ्यासक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज