अ‍ॅपशहर

सॉ-मिलला आग लागून लाखोंचे नुकसान

शहरातील शिवाजीनगर लाकूडपेठेत असलेल्या शिवविजय सॉ-मिलला शनिवारी (दि. २४) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत सर्व जळाऊ साहित्य क्षणार्धात जळून खाक झाले. वेळेवर शिवाजीनगर उड्डाणपुलावरून बंब येवू शकत नसल्याने शिवाजीनगर पुलावरून धुराचे लोळ दिसत होते. जळगाव, धरणगाव, एरंडोल, भुसावळ, जामनेर आणि जैन इरिगेशनच्या बंबांची मदत घेतल्यानंतर तब्बल अठरा तासांनी आग आटोक्यात आणण्यात आली.

Maharashtra Times 26 Nov 2018, 5:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20181125011545_IMG_4521

शहरातील शिवाजीनगर लाकूडपेठेत असलेल्या शिवविजय सॉ-मिलला शनिवारी (दि. २४) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत सर्व जळाऊ साहित्य क्षणार्धात जळून खाक झाले. वेळेवर शिवाजीनगर उड्डाणपुलावरून बंब येवू शकत नसल्याने शिवाजीनगर पुलावरून धुराचे लोळ दिसत होते. जळगाव, धरणगाव, एरंडोल, भुसावळ, जामनेर आणि जैन इरिगेशनच्या बंबांची मदत घेतल्यानंतर तब्बल अठरा तासांनी आग आटोक्यात आणण्यात आली.

शिवाजीनगरातील लाकूडपेठेत अनेक वखारी असून, जवाहरभाई पटेल यांच्या मालकीची शिवविजय सॉ-मील आणि स्वस्तिक प्लायवूड ही दुकाने आहेत. शनिवारी (दि. २४) रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास दुकानाला अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज अद्यापपर्यंत व्यक्त करण्यात येत आहे. वखारीत लाकडाचे ओंडके, प्लायवूड, लॅमीनेटस्, फेवीकॉल, युरो, हार्डवेअर असे साहित्य होते. हे सर्व साहित्य जळाऊ, ज्वलनशील पदार्थ असल्याने काही वेळातच आगीचा भडका उडाला. कार्यालयासह मशिनरी आणि सर्व साहित्य आगीच्या झपट्यात आले होते. सॉमीलचे गेट आणि लोखंडी शटरची कुलूप उघडल्यावर परिसरातील नागरिक, पटेल कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांनी शक्य तेवढे सामान आणि कागदपत्रांचे महत्त्वाचे दस्तऐवज बाहेर काढण्यास सुरुवात केली. या आगीमध्ये लाखोंचा मुद्देमाल खाक झाला असून, एक दुचाकीदेखील भस्मसात झाली आहे. आगीत अंदाजे ८० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग विझविण्यासाठी जैन इरिगेशनच्या ११ बंबांसह तब्बल ७५ बंबांची मदत घेण्यात आली. आग लागलेला परिसर शिवाजीनगरात होता. शिवाजीनगर पुलावर क्रॉसबार लावण्यात आले असल्याने अग्निशमन दलाचे बंब येण्यास अडचण येत होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज