अ‍ॅपशहर

बदनामीकारक मजकुराने खळबळ

भारताच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या विषयी एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर बदनामीकारक मजकूर पसरविला जात असल्याने याबाबत चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कोळी समाजातर्फे करण्यात आली आहे.

Maharashtra Times 28 Jun 2017, 4:00 am
जळगाव : भारताच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या विषयी एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर बदनामीकारक मजकूर पसरविला जात असल्याने याबाबत चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कोळी समाजातर्फे करण्यात आली आहे. नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाजाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. २७) जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन देऊन केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sensational content on whatsapp group issue jalgaon
बदनामीकारक मजकुराने खळबळ


विद्यार्थिनीची आत्महत्या

जळगाव : तालुक्यातील धामणगाव येथील विद्यार्थिनीने बारावीला कमी मार्क मिळाल्याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. २७) घडली. आई-वडील पेरणी करून घरी परतल्यानंतर गळफास घेतलेल्या स्थितीत मुलीचा मृतदेह पाहताच त्यांना धक्का बसला. सोनाली नथ्यू सपकाळे (वय १८) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. सोनालीचा बारावीचा निकाल नुकताच लागला होता. यात तिला ५३ टक्के मिळाले. परीक्षेपूर्वी तिने जळगाव येथे क्लासेस लावले होते. चांगला अभ्यास करूनही मार्क्स कमी पडल्याने गेल्या काही दिवसांपासून सोनाली चिंताग्रस्त होती. यातूनच तिने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोनाली हीचा मृतदेह नागरिकांच्या मदतीने खाली उतरविण्यात आला. त्यानंतर सरपंच राजू सपकाळे यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज