अ‍ॅपशहर

‘सर्व्हिस टॅक्स, पीएफच्या कचाट्यातून वगळा’

महापालिकेच्या सफाईसह मक्तेदारांवर महापालिकेने पीएफ व सर्व्हिस टॅक्स आकारणी सुरू केली आहे. यामुळे मक्तेदारांचे धाबे दणाणले आहेत. अनेक मक्तेदारांनी शहर अभियंता दिलीप थोरात यांच्याकडे येऊन आम्हाला हे कर लागु होत नसल्याचा कांगावा करित वगळण्याची मागणी केली. त्यानंतर शनिवारी (दि. १५) महापौर लढ्ढा यांची भेट या मक्तेदारांनी घेतली.

Maharashtra Times 16 Apr 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम service tax provident fund of the mighty skip
‘सर्व्हिस टॅक्स, पीएफच्या कचाट्यातून वगळा’

महापालिकेच्या सफाईसह मक्तेदारांवर महापालिकेने पीएफ व सर्व्हिस टॅक्स आकारणी सुरू केली आहे. यामुळे मक्तेदारांचे धाबे दणाणले आहेत. अनेक मक्तेदारांनी शहर अभियंता दिलीप थोरात यांच्याकडे येऊन आम्हाला हे कर लागु होत नसल्याचा कांगावा करित वगळण्याची मागणी केली. त्यानंतर शनिवारी (दि. १५) महापौर लढ्ढा यांची भेट या मक्तेदारांनी घेतली.

महापालिकेचे जळगाव शहरातील ३७ प्रभागांपैकी २२ प्रभागात एकमुस्त पद्धतीने सफाईचे मक्ते दिले आहेत. तसेच सार्वजनिक शौचालय स्वच्छता, बांधकाम,विद्युत विभाग व पाणीपुरवठा विभागांच्या कामाचेदेखील मक्ते दिले आहेत. नुकतेच सरकारच्या नव्या जीआरनुसार महापालिकेने या मक्तेदारांच्या बिलांमधून सर्व्हिस टॅक्स व कामगारांच्या पीएफच्या रकमांची कपात करण्यात सुरुवात केली आहे. यामुळे सुमारे ६० मक्तेदार यामुळे अडचणीत आले आहेत.

यामुळे मक्तेदारांमध्ये खळबळ उडाली आहे. सफाईचे मक्ते घेतलेल्या काही मक्तेदारांनी आज गुरुवारी शहर अभियंता थोरात यांची भेट घेतली. आमच्याकडे २० पेक्षा कमी कामागार असल्याने पीएफचा कायदा लागु होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर शासनाचे हे आदेश मक्ते घेतल्यानतंर आल्यानतंर ते लागु होत नसल्याचा दावा देखिल मक्तेदारांनी केली आहे. त्यामुळे यातून वगळण्याची मागणी त्यांनी केली. दरमहा सफाईसाठी ३ लाख १० हजार रुपये देण्यात येतात. त्यातून पीएफ सर्व्हीस टॅक्स ३५ हजार व पीएफ २० हजार रुपये कपात होतात. प्रशासनाकडून दंड अकारला जातो. यातून उरणाऱ्या रकमेतून काम करणे अवघड होत असल्याचे मक्तेदारांचे म्हणणे आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज