अ‍ॅपशहर

Sushma Andhare : सुषमा अंधारे यांच्या सभेपूर्वीच तणाव; प्रबोधन यात्रेचे बॅनरच चोरले, पोलिसात तक्रार

Shiv sena News : पक्षातील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काही ठिकाणी वादाची ठिणगीही पडत आहे. आता जळगावत वादाला तोंड फुटलं आहे. याचं कारण आहे सुषमा अंधारे यांच्या सभेपूर्वी त्यांच्या स्वागताचे बॅनर चोरीला गेले आहेत. यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Nov 2022, 7:04 am
जळगाव : शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे ह्या आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून शिंदे गटात सहभागी झालेल्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांमध्ये त्यांची सभा होणार आहे. मात्र त्यांच्या सभेपूर्वीच तणाव निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपासजवळील एमएसईबीजवळ शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रबोधन यात्रेसाठी उपस्थितीच्या आवाहनाचे लावलेले बॅनर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ठाकरे गटातर्फे पाळधी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon news
सुषमा अंधारे यांच्या सभेपूर्वीच तणाव.... प्रबोधन यात्रेचे बॅनरच चोरली गेल्याने पोलिसात तक्रार


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आजपासून जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सुषमा अंधारे यांची सभा होणार आहे. ज्या ठिकाणी सभा होणार आहे, त्या ठिकाणी जय्यत तयारीचे बॅनर लावण्यात आले आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या वतीने सुषमा अंधारे यांच्या स्वागतासाठी पाळधी गावात लावलेले बॅनर अज्ञातांनी लंपास केले आहेत. यामुळे जळगावत राजकीय तणाव निर्माण झाला आहे.

सुषमा अंधारे म्हणजे तीन महिन्यांचं बाळ, जास्त बोलाल तर याद राखा, गुलाबरावांनी दम भरला...

या संदर्भात ठाकरे गटाचे शहर प्रमुख भागवत चौधरी यांनी पाळधी पोलिसात तक्रारी दिली आहे. पाळधी बायपास जवळील एमएसईबी जवळ शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या सत्काराचे बॅनर लावलेले होते. हे बॅनर ३० ऑक्टोबरला अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार त्यांनी केली आहे. पोलिसांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मी स्व ला मुख्यमंत्री समजतो; शिंदे गटातील आमदाराल पुन्हा मंत्री पदाचे वेध, शहरात बॅनर झळकले

महत्वाचे लेख