अ‍ॅपशहर

शिवाजीनगरातील महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू?

शहरातील शिवाजीनगर परिसरातील महिलेचा स्वाइन फ्लूमुळे खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना सोमवारी (दि. २९) सकाळी मृत्यू झाल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांकडून देण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Times 30 Apr 2019, 5:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivajinagar woman swine flu death not confirm at jalgoan
शिवाजीनगरातील महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू?


शहरातील शिवाजीनगर परिसरातील महिलेचा स्वाइन फ्लूमुळे खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना सोमवारी (दि. २९) सकाळी मृत्यू झाल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांकडून देण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सुफियाबी शेख अखलाक (वय ३८) असे आहेत. याबाबत अद्याप महापालिका रुग्णालय विभागाकडून कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही.
शिवाजीनगर परिसरातील अमन पार्क भागात आयशा मशिदजवळील रहिवासी सुफियाबी शेख अखलाक यांची प्रकृती शनिवार (दि. २७) पासून खराब होती. त्यांना उपचारासाठी शहरातीलच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे खासगी रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच सोमवारी (दि. २९) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबात महापालिका दवाखाने विभागाचे प्रमुख डॉ. राम रावलानी यांच्याशी संपर्क केला असता, अद्याप याबाबत माहिती घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी कर्मचारी संबंधित दवाखाने व महिलेच्या निवासस्थानाकडे पाठवले असल्याचेही राम रावलानी यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज