अ‍ॅपशहर

श्रीराम वहनोत्सवास शुक्रवारपासून प्रारंभ

जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान यांच्या विद्यमाने दि. २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान श्रीराम रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या रथोत्सवाचे १४५ वे वर्ष असून, शुक्रवार (दि. २०) पासून वहनोत्सवास प्रारंभ होत आहे. मंगळवारी (दि. ३१) कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला श्रीराम रथोत्सव होणार आहे.

Maharashtra Times 18 Oct 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shreeram vahanotsav start from friday at jalgaon
श्रीराम वहनोत्सवास शुक्रवारपासून प्रारंभ

जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान यांच्या विद्यमाने दि. २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान श्रीराम रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या रथोत्सवाचे १४५ वे वर्ष असून, शुक्रवार (दि. २०) पासून वहनोत्सवास प्रारंभ होत आहे. मंगळवारी (दि. ३१) कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला श्रीराम रथोत्सव होणार आहे.

परंपरेप्रमाणे या श्रीराम रथोत्सवात दररोज पहाटे पाच वाजता काकडा आरती, मंगला आरती, रामप्रहर महिला मंडळ यांचा सामुदायिक रामजप व हरिपाठ यानंतर सकाळी ११ वाजता श्रीराम मंदिरात भजन होईल. त्यानंतर सायंकाळी धूप आरतीनंतर ७ वाजता श्रीराम मंदिरापासून वहन मिरवणुकीस प्रारंभ होईल, असेही संस्थानाकडून सांगण्यात आले आहे.

श्रीराम रथोत्सवात पहिले वहन घोडा असणार आहे. संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते पूजेनंतर वहन मिरवणुकीस प्रारंभ केला जाणार आहे. यावेळी आमदार सुरेश भोळे, प्रभारी आयुक्त किशोर राजेनिंबाळकर, महापौर ललित कोल्हे, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, उद्योगपती वासुदेव महाजन, डीवायएसपी सचिन सांगळे उपस्थित राहणार आहेत. यानंतर दि. ४ नोव्हेंबरपर्यंत वहनोत्सव सुरू राहणार आहे. तसेच मंगळवारी दि. ३१ ऑक्टोबरला कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला श्रीराम रथोत्सव साजरा केला जाणार आहे. या संपूर्ण वहनोत्सवात जळगावसह पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानातर्फे करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज