अ‍ॅपशहर

‘गण गण गणांत बोते’चा गजर

शहरातील प्रेम नगरमध्ये शनिवारी (दि. १९) गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त सकाळी महाराजांच्या पादुकांची पालखी काढण्यात आली. हरिहरेश्वर महिला मंडळातर्फे हा कार्यक्रम झाला. टाळ, मृदंगाच्या स्वरात, फुगड्या खेळत पालखी प्रेम नगरातून नेण्यात आली.

Maharashtra Times 19 Feb 2017, 4:00 am
गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त पालखी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shri gajanan maharaj palakhi program at jalgaon city and raver
‘गण गण गणांत बोते’चा गजर


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरातील प्रेम नगरमध्ये शनिवारी (दि. १९) गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त सकाळी महाराजांच्या पादुकांची पालखी काढण्यात आली. हरिहरेश्वर महिला मंडळातर्फे हा कार्यक्रम झाला. टाळ, मृदंगाच्या स्वरात, फुगड्या खेळत पालखी प्रेम नगरातून नेण्यात आली.

पालखीचे असंख्य भाविकांनी दर्शन घेतले. दुपारी महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. बाळू कोष्टी यांच्या हस्ते पालखीची पूजा, अभिषेक करण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासून येथे गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचे पारायण सुरू होते. त्याची आज सांगता झाली. महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला. रात्री कीर्तनाचा कार्यक्रम झाला. विद्या पवार, रेखा येवले, नीलिमा येवले, शोभना पाटील, मंगला जैस्वाल, लता राणे, रश्मी जाखेटे आदींनी सहकार्य केले.

रावेरला कार्यक्रम

रावेर : शहरातील रोकडा हनुमान नगरात गजानन महाराज मंदिराचा जिर्णोद्धार कार्यक्रम शनिवारी (दि. १८) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. श्री स्वामी समर्थ महिला महाविद्यालयातही प्रकटदिनानिमित्त महाप्रसाद व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज