अ‍ॅपशहर

पिस्तूल रोखत साडेसहा लाखांची लूट

पेट्रोलपंपावरून रोख रक्कम नेहमीप्रमाणे मोटारसायकलने युनियन बँकेत भरण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यावर मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी भरदिवसा बँकेसमोर पिस्तूल रोखत ६ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम लूटून नेली. ही खळबळजनक घटना पहूर येथील युनियन बँकेसमोर दुपारी ३ वाजता घडली.

Maharashtra Times 19 Feb 2019, 5:00 am
पहूर येथे भरदिवसा बँकेसमोर घटना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम six lacs robbery at pahur by bikers
पिस्तूल रोखत साडेसहा लाखांची लूट


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

पेट्रोलपंपावरून रोख रक्कम नेहमीप्रमाणे मोटारसायकलने युनियन बँकेत भरण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यावर मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी भरदिवसा बँकेसमोर पिस्तूल रोखत ६ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम लूटून नेली. ही खळबळजनक घटना पहूर येथील युनियन बँकेसमोर दुपारी ३ वाजता घडली.

जामनेर तालुक्यातील पहूर-वाकोद रस्त्यावर अजिंठा ट्रेडर्स हा प्रवीण शिवराज जैन यांचा पेट्रोलपंप आहे. दररोज दुपारी तीन वाजेपर्यंतची रक्कम बॅगेत घेऊन कॅशियर संजय पारखे हे समाधान कुंभार याच्यासह मोटरसायकलने गेले. जामनेर रोडवरील युनियन बँकेसमोर दुचाकी थांबविली. त्याचवेळी समोरून मोटरसायकलने तिघांनी पारखे यांच्या गाडीला कट मारून हुज्जत घातली. पल्सरवरील मागे बसलेल्या तरुणाने पारखे यांच्याजवळील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पारखे यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना काही अंतर बॅगसह फरफटत नेले. या वेळी परिसरात व्यापाऱ्यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. यातील काहींनी पारखे यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी मोटरसायकलवर बसलेल्या दुसऱ्या तरुणाने पिस्तूल दाखवून मदतीसाठी सरसावणाऱ्यांना धमकावले. यामुळे पारखे यांना नाईलाजाने बॅग सोडावी लागली, बॅग हाती लागताच तिघेजण पल्सरवरून जामनेरकडे पसार झाले.

या प्रकरणी संजय पारखे यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. के. शिरसाट हे करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाहून पारशे यांच्यासह काही प्रत्यक्षदर्शींना घेऊन सोनाळा फाट्यावर असलेल्या हॉटेल चालकाकडे चौकशी केली. तेथून मिळालेल्या माहितीनंतर सोनाळा फाट्याजवळील दोन्ही बाजूला असलेल्या जंगलात शोधाशोध केली. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. जामनेरला एकाच रात्रीत तीन ठिकाणी दरोडा घातल्याचा प्रकार ताजा असताना काही दिवसांपूर्वी तीन महिलांचे खुनही झाले आहेत. या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

व्यावसायिकाची आत्महत्या
शहरातील ज्ञानदेवनगरात राहणाऱ्या प्रशांत गजानन बरडे (वय ४०) या केटरर्स व्यावसायिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजता उघडकीस आली. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशांत हे दुपारी घरी एकटे असताना त्यांनी पंख्याला दोरी बांधून गळफास लावून घेतला. दुपारी ४ वाजता त्यांचा मुलगा निखील हा घरी आला असता त्याला वडीलांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने आरडाओरड करून शेजारच्यांना घटना कळवली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज