अ‍ॅपशहर

'इडीची किंमत राज्यातील शेतकऱ्याच्या विडीपेक्षाही कमी'; धनंजय मुंडेंचा घणाघात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय तपास यंत्रणा, केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर सडेतोड टीका केली आहे. ईडीची किंमत आमच्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विडीपेक्षाही कमी आहे, असे वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे यांनी करत टीकेचे प्रहार केले आहेत. इतके सगळे करूनही महाविकास आघाडी सरकारला त्यांना काही करता आले नसल्याचे ते पुढे म्हणाले.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 May 2022, 11:01 pm
जळगाव: राज्याचे सत्तेचा दुरुपयोग करून केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या केंद्र सरकार व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली आहे. कुणासाठीही कधीही आणि कारण नसताना वापर केल्यामुळे ईडीची (ED) आमच्या राज्यातील शेतकऱ्याच्या विडीपेक्षाही किंमत कमी झाली असल्याचा टोला मंत्री धनंजय मुंडे यांनी लगावला. (social justice minister dhananjay munde criticizes and union govt and bjp)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम social justice minister dhananjay munde criticizes and union govt and bjp
'इडीची किंमत राज्यातील शेतकऱ्याच्या विडीपेक्षाही कमी'; धनंजय मुंडेंचा घणाघात


मागील अडीच वर्षात यांनी काय वापरले नाही?, ईडीची तर चवच गेली. शेतकऱ्याच्या विडीची किंमत तरी जास्त आहे, मात्र ईडीची किंमत नाही. इतके सगळे करूनही ते महाविकास आघाडीच्या सरकारला काहीच करता आले नाही.

क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! १३० रुपयांच्या उधारीसाठी गुप्तांग पिरगळले, दुकानदाराने केला तरुणाचा खून

भाऊ ( राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)) म्हणाले ते खरे आहे. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (Nationalist Congress Party) ताकद तर आहेच. भाऊ आल्यानंतर तर ती ताकद द्विगुणित झाली आहे. मात्र ही ताकद आकड्यात दिसायला हवी. ती आमदारांच्या आकड्यात दिसली पाहिजे, ती खासदारांच्या आकड्यात दिसली पाहिजे, ती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आकड्यात दिसली पाहिजे, ती नगरपालिकेच्या आकड्यात दिसली पाहिजे, महानगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या आकड्यात सुद्धा दिसली पाहिजे, असे आवाहन मुंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

क्लिक करा आणि वाचा- 'भोंग्याच्या मुद्द्यावर राज ठाकरेंना जनतेचा ठेंगा मिळाला'

केंद्र सरकार सीबीआयच्या (CBI) चौकश्या लावून थकले, आयकर विभाग ( Income Tax Department) मागे लावून थकले, याबरोबरच ईडीचा गैरवापर करून महाआघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकारने केला. मात्र यांचे हे सर्व प्रयत्न असफल ठरले, असे सांगत धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

क्लिक करा आणि वाचा- 'मुख्यमंत्री होण्याकरता गुणांचा विचार करावा, जातीचा नाही': मंत्री गुलाबराव पाटील

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज