अ‍ॅपशहर

समाजकार्य महाविद्यालय विद्यार्थ्यांचा मोर्चा

समाज कल्याण विभागाकडून आदिवासी विभाग वेगळा झाल्यावर सरकारने मंजूर केलेल्या आकृतीबंधात अधिकारी पदे समाजकार्य पदवीधारकांऐवजी कोणत्याही शाखेचा पदवीधारक अशी पात्रता ठेवली आहे.

Maharashtra Times 6 Oct 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम social workers college students morcha at jalgaon
समाजकार्य महाविद्यालय विद्यार्थ्यांचा मोर्चा


समाज कल्याण विभागाकडून आदिवासी विभाग वेगळा झाल्यावर सरकारने मंजूर केलेल्या आकृतीबंधात अधिकारी पदे समाजकार्य पदवीधारकांऐवजी कोणत्याही शाखेचा पदवीधारक अशी पात्रता ठेवली आहे. या निर्णयाच्या विरोधात समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच त्यानंतर माजी महसूल मंत्री आमदार एकनाथ खडसे यांना भेटून हा निर्णय रद्द करण्यासाठी साकडे घातले.

या आंदोलनाला गुरुवारी (दि. ५) सकाळी साडेदहा वाजता शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातून सुरुवात झाली. मोर्चात जळगाव जिल्ह्यातील समाजकार्य महाविद्यालयाचे सुमारे १ हजार आजी-माजी विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले होते. सरकारच्या भूमिकेला विरोध दर्शविण्यासाठी संघर्ष कोअर कमिटी जळगाव, जिल्हा आजी-माजी विदयार्थी असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके यांना निवेदन दिल्यानंतर शिष्टमंडळाने आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळात प्रा. डॉ. शाम सोनवणे, डॉ. वाय. जी. महाजन, प्रा. नीलेश चौधरी, डॉ. व्ही. आर. गुंजाळ, प्रा. योगेश महाजन आदींसह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज