अ‍ॅपशहर

विद्यार्थ्यांना नकोय पोलिसांचा जाच

जळगावच्या अपर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सुरू केलेल्या ‘कॉफी विथ पोलिस’ या उपक्रमाच्या दुसऱ्या भागात गुरुवारी, जळगावातील २५० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावेळी निर्भया पथकाची व वाहतूक पोलिसांच्या चिरीमिरीच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. तसेच महाविद्यालयीन परिसरात पोलिसांचा अनावश्यक हस्तक्षेप नको असल्याच्या भावनादेखील व्यक्त करण्यात आल्या.

Maharashtra Times 1 Jul 2016, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम student opposed to police
विद्यार्थ्यांना नकोय पोलिसांचा जाच

जळगावच्या अपर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सुरू केलेल्या ‘कॉफी विथ पोलिस’ या उपक्रमाच्या दुसऱ्या भागात गुरुवारी, जळगावातील २५० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावेळी निर्भया पथकाची व वाहतूक पोलिसांच्या चिरीमिरीच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. तसेच महाविद्यालयीन परिसरात पोलिसांचा अनावश्यक हस्तक्षेप नको असल्याच्या भावनादेखील व्यक्त करण्यात आल्या.

मोक्षदा पाटील यांनी जनतेचा पोलिसांशी असलेला संपर्क वाढावा, पोलिस व जनता यांच्यात समन्वय निर्माण व्हावा या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात केली आहे. पहिल्याच भागात युवा शक्तीच्या विध्यार्थ्यांशी सुसंवाद साधण्यात आला. गुरुवारी, सकाळी इकरा महाविद्यालय, देवकर इंजिनीअरिंग, आयएमआर कॉलेज, डी फार्मसीचे अडीचशेवर विद्यार्थी सहभागी झाले होते. मंचावर मोक्षदा पाटील होत्या. विद्यार्थ्यांनी संवाद साधताना निर्भया पथकाबद्दल तक्रार केली. महाविद्यालयांचा परिसर, मेहरूण तलाव ट्रॅकवर तरुण-तरुणी दिसल्यावर त्यांच्याविषयी कुठलीही खात्री न करता प्रेमी युगल म्हणून त्यांच्यावर केली जाणारी कारवाई, तसेच पथकाकडून मिळत असलेली उद्धट वागणूक याविषयी विद्यार्थ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. वाहतूक पोलिसदेखील उगाचच अडवून पावती न देता पैसे घेत असल्याची तक्रार काहींनी केली. महाविद्यालयात पोलिसांकडून होत असलेल्या अनावश्यक हस्तक्षेपाबाबत अपर अधीक्षक मोक्षदा पाटील यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर पाटील यांनीदेखील तुम्ही कायदा तोडू नका आणि पावतीशिवाय कुणालाही पैसे देऊ नका, असे आवाहन केले. जे कर्मचारी अशा प्रकारे काम करीत असतील त्यांच्या तक्रारी केल्यास आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, असे आश्वासन पाटील यांनी दिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज