अ‍ॅपशहर

‘अशिलाची बाजू मांडताना न्यायाशी बांधिलकी ठेवा’

न्यायालय व वकील व्यवसायाच्या प्रतिष्ठेसाठी प्रशिक्षित वकील घडविणे आवश्यक आहे. त्यासाठी अभिरुप न्यायालयासारख्या स्पर्धा आवश्यक आहेत. आपल्या अशिलाची बाजू मांडतांना न्यायाशीदेखील बांधिलकी ठेवा, असे आवाहन हायकोर्टाचे न्यायमूर्ती संगीतराव पाटील यांनी केले. मणियार लॉ कॉलेजमध्ये शनिवारी (दि. ११) अभिरुप न्यायालय स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

Maharashtra Times 12 Feb 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम students court program at g d bendale college jalgaon
‘अशिलाची बाजू मांडताना न्यायाशी बांधिलकी ठेवा’

न्यायालय व वकील व्यवसायाच्या प्रतिष्ठेसाठी प्रशिक्षित वकील घडविणे आवश्यक आहे. त्यासाठी अभिरुप न्यायालयासारख्या स्पर्धा आवश्यक आहेत. आपल्या अशिलाची बाजू मांडतांना न्यायाशीदेखील बांधिलकी ठेवा, असे आवाहन हायकोर्टाचे न्यायमूर्ती संगीतराव पाटील यांनी केले. मणियार लॉ कॉलेजमध्ये शनिवारी (दि. ११) अभिरुप न्यायालय स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे स्मृतीप्रित्यर्थ बाराव्या अभिरुप न्यायालय स्पर्धेचे शनिवारी, उद्घाटन करण्यात आले. या वेळी जळगावचे सत्र न्यायाधीश एम. ए. लोहकर, केसीई सोसायटीचे अॅड. एस. एस. फालक, सुनील चौधरी, प्रमोद पाटील, प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, मूककोर्ट सोसायटी समन्वयक डॉ. विजेता सिंग, प्रकाश पाटील उपस्थित होते.

न्यायमूर्ती पाटील यांनी, न्यायालयीन विलंबाची कारणे स्पष्ट केलीत. तसेच अशा स्पर्धांमधून प्रशिक्षित वकील तयार तयार होत असल्याचे सांगितले. सत्र न्यायाधीश लोहकर यांनी चांगल्या वकिलाच्या अंगी काय गुणवैशिष्ट्ये असावी, त्याचा ऊहापोह केला. प्रकाश पाटील यांनी न्यायालयीन विलंबावर भाष्य करून लोकांना न्याय त्वरित मिळवून देण्यासाठी भावी वकिलांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.

२१ संघ सहभागी

अभिरुप न्यायालय स्पर्धेत राज्यांमधून २१ संघ सहभागी झाले होते. ५० हून अधिक स्पर्धकांचा समावेश आहे. प्रत्येक संघाला देशभरातील गाजलेल्या विविध खटल्यांचे विषय देण्यात आले होते. यावर सहभागी स्पर्धकांनी आपला युक्तिवाद मांडला. स्पर्धेसाठी चार कोर्ट रुम तयार करण्यात आले होते. आज (दि. १२) स्पर्धेच्या समारोप असून, सकाळी ११.३० वाजता अंतिम फेरी होणार आहे. समारोपाच्या अध्यक्षस्थानी सचिव अ‍ॅड. एस. एस. फालक हे असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचे न्यायमूर्ती ए. एम. ठिपसे हे राहणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज