अ‍ॅपशहर

विद्यार्थी अकरा, शिक्षक-कर्मचारी पंधरा

महापालिकेचे दादासाहेब भोईटे माध्यमिक विद्यालय हे मध्यवर्ती परिसरातील दुमजली इमारतीत आहे. या शाळेत सर्व वर्गांचे एकूण ११ विद्यार्थी आहेत. या ११ जणांसाठी मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी असा सुमारे १५ जणांचा गोतावळा असल्याची माहिती समोर आल्याने महापौर लढ्ढादेखील चक्रावले आहेत.

Maharashtra Times 11 Apr 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम students eleven and teachers staff fifteen at zp school jalgaon
विद्यार्थी अकरा, शिक्षक-कर्मचारी पंधरा

महापालिकेचे दादासाहेब भोईटे माध्यमिक विद्यालय हे मध्यवर्ती परिसरातील दुमजली इमारतीत आहे. या शाळेत सर्व वर्गांचे एकूण ११ विद्यार्थी आहेत. या ११ जणांसाठी मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी असा सुमारे १५ जणांचा गोतावळा असल्याची माहिती समोर आल्याने महापौर लढ्ढादेखील चक्रावले आहेत.

महापालिकेतर्फे वीज, पाणी, देखभाल दुरुस्ती व लाखो रुपये खर्च केला जातो. मात्र, या शाळेत केवळ नववी व दहावीचा एक-एक वर्ग आहे. दोन्ही वर्गांची मिळून केवळ ११ पटसंख्या असून, एक मुख्याध्यापक, चार उपशिक्षक, एक लिपिक, तीन शिपाई असे एकूण नऊ कर्मचारी आहेत. नऊ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेकडून वेतन मिळत असले, तरी विद्यार्थी पटसंख्या केवळ ११ आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना मनपाच्या अन्य शाळेत प्रवेश देऊन शिक्षकांचे समायोजन करण्याची हालचाल सुरू झाली आहे.

आठवीचा वर्गच नाही

या शाळेत आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण मिळते. मात्र, २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात आठवीच्या वर्गात एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज