अ‍ॅपशहर

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार!

राज्याच्या समाजकल्याण विभागांतर्गत आणि सरकारतर्फे दिल्या जाणारी शिष्यवृत्ती जळगावसह धुळे जिल्ह्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी जळगावला मंगळवारी (दि. १९) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने येथील समाजकल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

Maharashtra Times 20 Sep 2017, 4:17 am
अभाविपकडून जळगावच्या समाजकल्याण कार्यालयात ठिय्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम students protest for scholarship at social and welfare office jalgaon
शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार!


टीम मटा

राज्याच्या समाजकल्याण विभागांतर्गत आणि सरकारतर्फे दिल्या जाणारी शिष्यवृत्ती जळगावसह धुळे जिल्ह्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी जळगावला मंगळवारी (दि. १९) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने येथील समाजकल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तर धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराजच्या भूमिकेतील अनोखा मोर्चा काढून सरकारचा निषेध केला.

जळगाव : गेल्या दोन वर्षांपासून समाजकल्याण विभाग व महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती सरकारच्या नाकर्तेपणामुळे थकित असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत शिष्यवृत्ती देण्याची मागणी केली. यावेळी शिष्यवृत्ती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक समस्यांना समोर जात असल्याचे आंदोलनकर्त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शिष्यवृत्ती ही राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग आहे. महागडे उच्चशिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती एक आधार आहे. सरकार एकाबाजूला विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना घोषित करत आहे. त्याच्या जाहिरातीचे फलकही सर्वत्र लावले जात आहेत. पण घोषित शिष्यवृत्ती मात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी अनेक वर्ष उलटून जात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचेही आंदोलकांनी सांगितले.

फोनवर दिले आश्वासन

महाविद्यालयातील विद्यार्थी हा शिष्यवृत्तीसाठी समाज कल्याण आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे खेटे मारून थकला आहे. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून, निंदनीय असल्याचे महानगरमंत्री विराज भामरे, शिवाजी भावसार, हर्षल पटेल यांनी बोलताना सांगितले. यावेळी अभाविपतर्फे आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. निवेदनदेतेवेळी सहाय्यक आयुक्त विभागीय कार्यालय नाशिकला बैठकीस गेले होते, त्यामुळे त्यांनी फोनवरून विद्यार्थ्यांशी संवाद साधून आठ दिवसांत स्थानिक प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन दिले. शासन स्तरावरील निर्णय माझ्यातर्फे सरकारपर्यंत पोहचवले जातील, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.

घोषणाबाजीने दणाणले दालन

या आंदोलनावेळी ‘बडोले साहब हमे पढने दो, देश को आगे बढने दो’, ‘शिष्यवृत्ती आमच्या हक्काची-नाही कुणाच्या बापाची’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देऊन विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी रितेश चौधरी, रिद्धी वाडीकर, चैतन्य निकम, कविता ठाकरे, कोमल पाटील, अनिकेत साळुंखे, ललीत तोगे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज