अ‍ॅपशहर

चाळीसगावात विद्यार्थी सुविधा केंद्र

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी. पी. कला, एस. एम. ए. विज्ञान व के. के. सी. वाणिज्य महाविद्यालयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले.

Maharashtra Times 28 Aug 2017, 4:00 am
जळगाव ः चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी. पी. कला, एस. एम. ए. विज्ञान व के. के. सी. वाणिज्य महाविद्यालयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. शनिवारी (दि. २६) या केंद्राचे उद्घाटन कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी अविष्कार जाधव आणि निकीता महाले यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम students service center start in chalisgaon
चाळीसगावात विद्यार्थी सुविधा केंद्र


कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांनी जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी फैजपूर, चाळीसगाव, शहादा, नंदुरबार, अमळनेर आणि धुळे या सहा ठिकाणी विद्यार्थी सुविधा केंद्र उघडण्याचे ठरविले आहे. यातील चौथ्या केंद्राचे उद्घाटन शनिवारी चाळीसगाव येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी.कला, एस,एम.ए. विज्ञान व के. के. सी. वाणिज्य महाविद्यालयात करण्यात आले. उपप्राचार्य अजय काटे यांनी

आभार मानले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज