अ‍ॅपशहर

‘जलयुक्त’ योजनेचे आराखडे सादर करा

जलयुक्त शिवार कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य जिल्हा दौऱ्यासंदर्भात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी गुरुवारी (दि. १८) जलयुक्त शिवार योजनेचा बाबनिहाय आढावा घेतला.

Maharashtra Times 19 May 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम submit the plan for jalyukta scheme
‘जलयुक्त’ योजनेचे आराखडे सादर करा


जलयुक्त शिवार कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य जिल्हा दौऱ्यासंदर्भात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी गुरुवारी (दि. १८) जलयुक्त शिवार योजनेचा बाबनिहाय आढावा घेतला. ज्या गावांचे आराखडे अद्याप प्राप्त झालेला नसतील अशा गावांचे आराखडे येत्या दोन दिवसात सादर करण्याचे आदेश त्यांनी बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत विविध गोष्टींचा आढावा घेतला. तसेच आराखडे येत्या दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश यावेळी उपस्थितांना दिले. आराखडे घेताना वस्तुनिष्ठ आराखडे स्वीकृत करावे, आराखडे उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकारी त्यांच्या स्तरावर खात्री करून घ्यावे, जून महिन्यापूर्वी कामे पूर्ण होतील यांची दक्षता संबंधितांनी घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीस उपविभागीय अधिकारी जलज शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी, पाचोरा मनीषा खत्री, जळगाव उप वनसरंक्षक आदर्शकुमार रेड्डी, यावल उप वनसरंक्षक संजय दहिवले. जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, रोहयो उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कुटे उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज