अ‍ॅपशहर

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

शहरातील सरस्वती नगर परिसरातील एका तरुणाने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. १४) दुपारी ४ वाजता उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, तो रेल्वेत नोकरीला होता.

Maharashtra Times 15 Oct 2018, 5:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम suicide by youth at jalgaon
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


शहरातील सरस्वती नगर परिसरातील एका तरुणाने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. १४) दुपारी ४ वाजता उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, तो रेल्वेत नोकरीला होता.

नवरात्रोत्सवानिमित्त मयुरचे कुटुंबीय मनुदेवीला दर्शनासाठी गेले असता मयुर सुनील भंगाळे (वय २४, रा. सरस्वतीनगर) याने रविवारी (दि. १४) राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मयुर हा अविवाहित होता. नुकताच तो रेल्वेत नोकरीला लागला होता. दरम्यान, सायंकाळी ४ वाजता कुटुंबीय घरी आल्यावर मागच्या खोलीत मयुरने गळफास घेतल्याचे दिसून आले. हे चित्र पाहुन कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. नागरिकांनी मयुरला खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज