भुसावळ : भुसावळ पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी मंगळवारी (दि. १४) हात उंचावून निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये भाजपचे सभापतिपदाचे उमेदवार सुनील श्रीधर महाजन हे चार मतांनी विजयी झाले. तर उपसभापतिपदी मनिषा पाटील या विजयी झाल्या. भुसावळ पंचायत समितीसाठी पिठासीन अधिकारी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी हात उंचावून मतदान घेतले. प्रक्रिया पार पडताच निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी सभापती पदासाठी सुनिल नेहेते तर उपसभापती पदासाठी मनिषा पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले.
जामनेरला भाजपच
जामनेरला सभापतिपदी भाजपच्या संगीताबाई आनंदा पिठोडे (नेरी गण) तर उपसभापतिपदी भाजपचे गोपाळ धनसिंग नाईक (देऊळगाव गण) यांची निवड करण्यात आली.
जामनेरला भाजपच
जामनेरला सभापतिपदी भाजपच्या संगीताबाई आनंदा पिठोडे (नेरी गण) तर उपसभापतिपदी भाजपचे गोपाळ धनसिंग नाईक (देऊळगाव गण) यांची निवड करण्यात आली.