अ‍ॅपशहर

सणांचा खरा अन्वयार्थ समजा

सणांचे उत्सवाचे व बाजारू स्वरूप झाले असून, सणावारांचा बाजार झाला की त्याचा भाव कमी होतो. तसे न होता सण, उत्सवांचा अन्वयार्थ समजून घेतला पाहिजे. एकत्र येऊन बोलले व विचारमंथन करा.

Maharashtra Times 24 Oct 2017, 4:00 am
अभिनेते मकरंद अनासपुरेंचे आवाहन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम suppose the real interpretation of festivals says makrand anaspure at chalisgaon
सणांचा खरा अन्वयार्थ समजा


म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

सणांचे उत्सवाचे व बाजारू स्वरूप झाले असून, सणावारांचा बाजार झाला की त्याचा भाव कमी होतो. तसे न होता सण, उत्सवांचा अन्वयार्थ समजून घेतला पाहिजे. एकत्र येऊन बोलले व विचारमंथन करा. आपल्या समाजाचा विकास कसा होईल याचा विचार केला पाहिजे, असे परखड मत मराठी सिनेकलाकार मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. ते रोटरी मिलेनिअम कडून आयोजित ‘गौरव माझ्या गावाचा’कार्यक्रमात बोलत होते.

रविवारी (दि. २२) सायंकाळी शहरातील य. ना. चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर आमदार उन्मेश पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, दीपस्तंभ फाउंडेशनचे अध्यक्ष यजुर्वेंद्र महाजन, रोटरीचे अध्यक्ष डॉ. शैलेंद्र राजपूत, माजी प्रांतपाल डॉ. सुनील राजपूत, सहाय्यक प्रांतपाल मनीष शहा, सचिव प्रमोद गुळेचा, वृक्ष मित्र अरूण निकम, प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. शैलेंद्र राजपूत, सूत्रसंचालन विजया महाले, संदीप जैन यांनी केले. कार्यक्रमास शहरातील विद्यार्थी, युवक, युवती, महिला तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

रस्त्याबाबत नाराजी

आपल्या मनोगताच्या सुरुवातीलाच मकरंद अनासपुरे यांनी मालेगाव-चाळीसगाव या खराब रस्त्याबाबत भाष्य करीत प्रशासन अन् शासकीय यंत्रणेतील ढिसाळ कारभारावर बोट ठेवले. देश महासत्ता होण्याच्या अगोदर देशातील रस्ते सुधारा त्यामुळे लोकांना किमान रस्त्यावर नीट चालता येईल, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. यावर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत समर्थन केले यानंतर आपल्या मनोगतात त्यांनी तीनवेळा या रस्त्याच्या दुर्दशेबाबत चिमटे काढले.

या गुणीजनांचा सत्कार

दिव्यांगांसाठी झटणाऱ्या मीनाक्षी निकम, नासा गर्ल स्वीटी पाटे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, कमर्शिअल पायलट हर्षा राजपूत, आयएफएस अधिकारी डॉ. अर्जुन देवरे, गृह मंत्रालयातील अधिकारी आश्विन जैन यांचा सत्कार करण्यात आला. स्वीटी पाटे, अर्जुन देवरेंच्या अनुपस्थितीत त्यांच्या पालकांनी सत्कार स्वीकारला.


ग्रामीण भाषेत गोडवा

समाजातील अलौकिकतेचे धागे निवडून ते बारकाईने पाहणे आवश्यक आहे. मी तर माझ्या गावासाठी माझ्या मातीसाठी काय करतो. ही समर्पणाची भावना प्रत्येकात असणेही तितकेच आवश्यक असल्याचे ते शेवटी म्हणाले. मी भाषेला नव्हे तर भाषेने मला भाषेने मोठं केल्याचे सांगत ग्रामीण भाषेत गोडवा असल्याचे अनासपुरे यांनी सांगितले. घशात देशप्रेम असता कामा नये ते प्रत्यक्ष कृतीत उतरायला हवे, असेही ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज