अ‍ॅपशहर

बोदवडला मजुराचा संशयास्पद मृत्यू

बोदवड शहरात ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या एका मजुराचा मृतदेह डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असलेल्या दुकानामागील परिसरात शुक्रवारी (दि. २८) रोजी सकाळी साडेसहा वाजता संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याच्या डोक्याला व डोळ्याला मार लागल्याच्या खुणा दिसत असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Times 30 Apr 2017, 4:00 am
जळगाव : बोदवड शहरात ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या एका मजुराचा मृतदेह डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असलेल्या दुकानामागील परिसरात शुक्रवारी (दि. २८) रोजी सकाळी साडेसहा वाजता संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याच्या डोक्याला व डोळ्याला मार लागल्याच्या खुणा दिसत असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम suspicious death at bodwad
बोदवडला मजुराचा संशयास्पद मृत्यू


गोपाळ तुकाराम माळी (वय ५२) हे ट्रॅक्टरवर मजुरीचे काम करीत होते. मात्र शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मेन रोडलगत मृत अवस्थेत शुक्रवारी त्यांचा मृतदेह आढळला. त्याच्या डोक्याला व डोळ्याला मार लागल्याच्या खुणा दिसत होत्या. गजानन नामदेव माळी यांच्या खबरीवरून पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंद दाखल असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सिद्धार्थ खर करीत आहेत. गोपाळ माळी याचा घातपात करण्यात आला की काय, याबाबत तर्कवितर्क लढविले जात असून, गुन्हा घडण्याचे प्रमुख कारण त्यांच्या घरगुती किंवा इतर वादामुळे तर त्याचा कोणी घात केला तर नाही, अशी चर्चाही ऐकायला मिळत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी अमिर यांनी घटनास्थळाची पाहणी करून बोदवडला बराच वेळ थांबून होते. या घटनेचा तपास सुरू असून, आरोपीला लवकर जेरबंद केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज