अ‍ॅपशहर

तरुणाचा संशयास्पद मृत्यू

मित्राच्या लग्नासाठी जळगावात आलेल्या हरिविठ्ठल नगरात परिसरातील घरात गळफास लागलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. दारे सताड उघडे असल्यामुळे तसेच तरुणाचे दोन्ही पायाचे गुडघे जमिनीवर टेकलेले असल्यामुळे घातपात झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. शनिवारी (दि. १५) सकाळी ७ वाजता हा प्रकार उघडकीस आला. दीपक भरत गावंडे (वय २६, रा. हरिविठ्ठलनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Maharashtra Times 16 Dec 2018, 5:00 am
गळफासाच्या अवस्थेत मृतदेह
महाराष्ट्र टाइम्स.कॉम suspicious death of the youth in jalgoan city harivithhal nagar area
तरुणाचा संशयास्पद मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

मित्राच्या लग्नासाठी जळगावात आलेल्या हरिविठ्ठल नगरात परिसरातील घरात गळफास लागलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. दारे सताड उघडे असल्यामुळे तसेच तरुणाचे दोन्ही पायाचे गुडघे जमिनीवर टेकलेले असल्यामुळे घातपात झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. शनिवारी (दि. १५) सकाळी ७ वाजता हा प्रकार उघडकीस आला. दीपक भरत गावंडे (वय २६, रा. हरिविठ्ठलनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

गावंडे कुटुंबीय काही वर्षांपासून हरिविठ्ठलनगरात राहतात. त्यानंतर २२ नोव्हेंबरपासून ते नंदुरबार येथे राहण्यासाठी गेले आहेत. दीपक याचा मोठा भाऊ नीलेश, वहिणी दोघे शिक्षक असल्यामुळे सर्व कुटुंबीय नंदुरबार येथे गेले आहेत. दीपक हा आरटीओ कार्यालयात वाहनचालक म्हणून काही दिवस काम करीत होता. काही दिवसांपासून दीपकदेखील नंदुरबार येथे गेला होता. दि. १८ डिसेंबर रोजी दीपकचा मित्र नवल याचे लग्न असल्यामुळे तो दोन दिवसांपासून जळगावी आला होता. शुक्रवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत त्याने मित्राच्या लग्नपत्रिका वाटल्या. रात्री हरिविठ्ठल येथील त्याच्या घरात एकटाच झोपण्यासाठी गेला होता. आज शनिवारी (दि. १५) सकाळी ७ वाजता शेजारी राहणारा एक लहान मुलगा दीपककडे गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घरात झोक्यासाठी बांधलेल्या दोरीने त्याचा गळा आवळलेला होता. रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज