अ‍ॅपशहर

थरार अनुभवाने भारावले प्रेक्षक

स्वत:चा शोध घेवून सेवेच्या भावनेने झपाटलेले ३ प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व...त्यांचे थरारक अनुभव...अन् ते अनुभवताना भारावलेले प्रेक्षक...असे सुंदर वातावरण शनिवारी (दि. १२) कांताई सभागृहात निर्माण झाले होते.

Maharashtra Times 13 Nov 2017, 4:00 am
‘स्वयं’च्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या संघर्षमय प्रवासाने जळगावकरांना जिंकले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम swayam amrutyatra present program at jalgaon opens inspirable things
थरार अनुभवाने भारावले प्रेक्षक


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

स्वत:चा शोध घेवून सेवेच्या भावनेने झपाटलेले ३ प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व...त्यांचे थरारक अनुभव...अन् ते अनुभवताना भारावलेले प्रेक्षक...असे सुंदर वातावरण शनिवारी (दि. १२) कांताई सभागृहात निर्माण झाले होते. अमृतयात्रा प्रस्तुत 'स्वयं' च्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने जळगावकरांना अक्षरश: जिंकून घेतले. विशेष म्हणजे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा संघर्षमय प्रवास ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी त्यांच्या शैलीत उलगडून घेतल्याने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला. 'महाराष्ट्र टाइम्स' या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर होते.

कांताई सभागृहात आयोजित सीरिया, जॉर्डन व येमेन देशात युद्धजन्य परिस्थितीत सेवा देणारे नाशिकचे डॉ. भरत केळकर, अंधांसाठी चित्र काढणारे चित्रकार चिंतामणी हसबनीस व रूरल रिलेशन्स कंपनीच्या माध्यमातून दहा लाख मुलांपर्यंत पुस्तके व कंप्युटर्स पोहोचवणारे प्रदीप लोखंडे अशा तीन व्यक्तिमत्त्वांचे अनुभव कथनाचा हा कार्यक्रम होता. त्यांचा प्रवास उलगडण्यासाठी व्यासपीठावर मुख्य वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर उपस्थित होते. स्वयंमचे नवीन काळे यांनी सुरुवातीला प्रास्ताविक केले. यावेळी पुखराज पगारिया, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अप्पा गायकवाड, दीपस्तंभचे प्रा. यजुर्वेंद महाजन यांचा सत्कार करण्यात आला.

तरुणांना दिशा देणारा प्रवास

प्रदीप लोखंडे यांनी रूरल रिलेशन्स या कंपनीच्या माध्यमातून भारतातील सुमारे ४९,००० गावांचा सखोल अभ्यास केला. तसेच दहा लाख मुलांपर्यंत पुस्तके व कंप्युटर्स पोहोचवण्याचे काम केले. हे सर्व काम कसे केले येणाऱ्या अडचणीवरील केलेली मात याची माहिती प्रदीप लोखंडे यांनी दिली. त्यांनी ग्रामीण भारताबद्दलचे गैरसमज त्यांनी दूर केले. त्याचा हा प्रवास उपस्थितांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरला. प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे अनुभवकथन व ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या खास शैलीतील प्रश्नांमुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

व्यक्त होण सोपे होते

रुढ अर्थाने अंध असलेल्या मित्रांसाठी चित्र काढावी या भावनेने झपाटलेल्या चित्रकार चिंतामणी हसबनीस यांनी सहा महिने स्वत: डोळ्यावर पट्टी बांधून अनुभव घेतला. ब्रेल लिपीचा आधार घेत त्यांनी अंध बांधवासाठी चित्रे काढली. बघता बघता एक चित्रमालिकाच त्यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज