अ‍ॅपशहर

सहा महिन्यांनंतर सुरू होणार ‘जलतरण’

महापालिकेचा बंद असलेला जलतरण तलाव स्वंयसेवी सस्थेस १० वर्षे चालविण्यासाठी देण्याचा प्रस्ताव करण्यात आला. त्यानंतर एसजीएन कन्ट्रक्शनची निविदा मंजूर करण्यात आली.

Maharashtra Times 27 May 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम swimng pool start in six months
सहा महिन्यांनंतर सुरू होणार ‘जलतरण’


महापालिकेचा बंद असलेला जलतरण तलाव स्वंयसेवी सस्थेस १० वर्षे चालविण्यासाठी देण्याचा प्रस्ताव करण्यात आला. त्यानंतर एसजीएन कन्ट्रक्शनची निविदा मंजूर करण्यात आली. त्यांना लगेचच कार्यादेश देण्यात येणार असून, तलाव दुरुस्तीच्या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली.

मक्तेदारास तीन वर्षासाठी चालविण्यास दिलेल्या महापालिकेच्या मालकीचा कै. राजाराम आत्माराम कोकीळ गुरुजी जलतरण तलावात अशुद्ध पाणी व नादुरुस्त फिल्टर (शुद्धिकरण) प्लँटमुळे सभासदांच्या तक्रारी वाढल्या असतांनाच ८ ऑक्टोबर २०१५ रोजी या ठेकेदाराने जलतरण तलाव कुलूपबंद केला. फिल्टर प्लँटची दुरुस्तीची मागणी करुनही महापालिका प्रशासन त्यावर कारवाई करीत नसल्याने एक वर्ष अगोदर करारनामा संपुष्टात आणत असल्याचे मक्तदोराने महापालिका प्रशासनाला सांगीतले. त्यानंतर प्रशासनानेदेखील मक्तेदारावर कारवाईसाठी विधी शाखेकडून प्रक्रिया सुरू केली होती. या वादात जलतरण तलाव मात्र तेव्हापासून आजपर्यंत बंदच आहे.

अखेर महालिपालिकेने तलावाची संपूर्ण दुरुस्ती करून तो मेन्टेन करून चालविण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार एसजीएन कन्ट्रक्शनने वार्षिक २ लाख ५१ हजार महापालिकेला देण्याची मान्यता दिल्याने त्यांची निविदा मंजूर करण्यात आली. जलतरण तलावाच्या दुरुस्तीसाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च येणार आहे. दुरुस्तीचे काम सहा महिने चालणार असून त्यानंतर जलतरणा तलाव खुला करण्यात येणार असल्याची माहिती मनपाने दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज