अ‍ॅपशहर

तनयच्या परफॉर्मन्सकडे खान्देशचे लक्ष

आपल्या आगळ्या-वेगळ्या जबरदस्त परफॉर्मन्सने स्टार प्लसच्या डान्स प्लस २ या कार्यक्रमातून जळगावसह खानदेशचे नाव भारतभरात पोहोचविणारा लिटल मास्टर तनय मल्हाराच्या पुढील परफॉर्मन्सची आता सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. आठ स्पर्धकांमधून सोलो कॅटेगरीमध्ये प्रवेश मिळविणारा तनय हा एकमेव स्पर्धक ठरला आहे.

Maharashtra Times 28 Aug 2016, 8:41 am
म. टा. वृत्तसेवा, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tanay jalgaon
तनयच्या परफॉर्मन्सकडे खान्देशचे लक्ष


आपल्या आगळ्या-वेगळ्या जबरदस्त परफॉर्मन्सने स्टार प्लसच्या डान्स प्लस २ या कार्यक्रमातून जळगावसह खानदेशचे नाव भारतभरात पोहोचविणारा लिटल मास्टर तनय मल्हाराच्या पुढील परफॉर्मन्सची आता सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. आठ स्पर्धकांमधून सोलो कॅटेगरीमध्ये प्रवेश मिळविणारा तनय हा एकमेव स्पर्धक ठरला आहे.

वोटिंगसाठीच्या आजच्या शोमध्ये तनयने सोनाक्षी सिन्हासह अनेक सेलिब्रिटींच्या डोळ्यांचे पारणे फेडले. आयुष्यमान खुराणाच्या पानीदा रंग देख के या गाण्यावर तनयने जो परफॉर्म दिला त्याने सर्वांना निःशब्द व आश्चर्यचकीत केले. या गाण्यात तो पाण्याचा थेंब, लहर तसेच पक्षी बनला. रेमो डिसुझा, धर्मेश, शक्ती ही मंडळी तर तनयची दिवानी झालेली आहे. तनयची अपार मेहनत घेण्याची वृत्ती, नृत्याप्रती त्याचे समर्पण, जास्त वेळ मेहनत घेण्याची तयारी, त्याचप्रमाणे आपल्या निरागस व विनम्र स्वभावामुळे तो सर्वांचा लाडका झालेला आहे.

खान्देशचा हा गौरव अबाधीत ठेवण्यासाठी सर्व मिळून आता तनयला १८००८३३३३ ५१ या टोल फ्री नंबरवर आज (दि.२८) रात्री ८ ते १० पर्यंत मिस कॉल देऊन वोट करण्याचे आवाहन कलाप्रेमींनी केले आहे. दरम्यान, तनयच्या यशासाठी गायत्री परिवारातर्फे होम-हवन करण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज