अ‍ॅपशहर

टॉप सहामध्ये तनयचा समावेश होणार?

खान्देशचा कंटेम्प्ररी डान्सर तनय मल्हारा स्टार वाहिनीच्या डान्स प्लस या शोमध्ये मागील दीड महिन्यापासून आपल्या कलेची चुणूक दाखवत या कार्यक्रमाचे मास्टर्स व कोरिओग्राफर्स या सर्वांचे मन जिंकत आहे. त्याने परफॉर्म केलेल्या प्रत्येक डान्समध्ये सर्वात जास्त गुण घेतलेले आहेत.

Maharashtra Times 30 Jul 2016, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tanay malara
टॉप सहामध्ये तनयचा समावेश होणार?


खान्देशचा कंटेम्प्ररी डान्सर तनय मल्हारा स्टार वाहिनीच्या डान्स प्लस या शोमध्ये मागील दीड महिन्यापासून आपल्या कलेची चुणूक दाखवत या कार्यक्रमाचे मास्टर्स व कोरिओग्राफर्स या सर्वांचे मन जिंकत आहे. त्याने परफॉर्म केलेल्या प्रत्येक डान्समध्ये सर्वात जास्त गुण घेतलेले आहेत.

या कार्यक्रमातील टॉप १२ मधून येत्या दोन आठवड्यात परफॉर्मन्स बेसवर टॉप सहा स्पर्धक निवडण्यात येणार आहेत. तनय केव्हा टॉप सहामध्ये येतो याची खान्देशवासियांना व त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागून आहे. त्याचे नृत्य शनिवार व रविवार रोजी रात्री ८ वाजता स्टार प्लस वाहिनीवर डान्स प्लस या कार्यक्रमात पाहता येणार आहे. आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात तनयने सर्वाधिक २५ गुण मिळवले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज