अ‍ॅपशहर

टीईटीत प्रश्नांमुळे परीक्षार्थींचा गोंधळ

शिक्षण परीक्षा मंडळ, पुणे यांच्याकडून शनिवारी (दि. २२) होणाऱ्या शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत उशीरा पोहचल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले.

Maharashtra Times 23 Jul 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम teachers entrance test questions mistakes
टीईटीत प्रश्नांमुळे परीक्षार्थींचा गोंधळ


शिक्षण परीक्षा मंडळ, पुणे यांच्याकडून शनिवारी (दि. २२) होणाऱ्या शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत उशीरा पोहचल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले. तसेच या पेपरमध्ये झालेल्या व्याकरण चुकांमुळे परीक्षार्थींची तारांबळ उडाली होती.

शनिवारी (दि. २२) शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर १ सकाळी १०.३० वाजता होता. २१ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. काही परीक्षा केंद्रावर अनेक विद्यार्थी उशीरा पोहचले. यावेळी परीक्षकांनी त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. प्रश्नपत्रिकेत १५० प्रश्नांपैकी अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना समजले नसल्याने गोंधळ निर्माण झाला होता. प्रश्नपत्रिकेत व्याकरणाच्यादेखील अनेक चुका होत्या. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ साठी एकूण ६१७४ विद्यार्थी होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज