अ‍ॅपशहर

महापालिका निवडणुकीसाठी युतीचा फैसला आज

महापालिका निवडणुकीसाठी आमच्या इच्छुक उमेदवारांची अर्ज छाननी झाली असून, त्यानंतर आम्ही युतीच्या फैसल्यावर आज शिवसेनेसोबत चर्चा करणार आहोत, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री दिली. तसेच आम्ही आरपीआयलाही स्थान देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे ‘फिफ्टी प्लस’ पेक्षा जागा निवडून येतील असा दावाही मंत्री महाजनांनी यावेळी केला.

Maharashtra Times 10 Jul 2018, 4:00 am
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे वक्तव्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम DSC_1275


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिका निवडणुकीसाठी आमच्या इच्छुक उमेदवारांची अर्ज छाननी झाली असून, त्यानंतर आम्ही युतीच्या फैसल्यावर आज शिवसेनेसोबत चर्चा करणार आहोत, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री दिली. तसेच आम्ही आरपीआयलाही स्थान देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे ‘फिफ्टी प्लस’ पेक्षा जागा निवडून येतील असा दावाही मंत्री महाजनांनी यावेळी केला.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सोमवारी दुपारपासून जळगावात आले होते. मात्र, त्यांनी शहराबाहेर दोन ठिकाणी निवडणुकीसंदभार्त गुप्त बैठका घेतल्या. तसेच मंत्री महाजन यांच्यावर विश्वास ठेवून महापौर ललित कोल्हे हे माजी आमदार सुरेश जैन यांची साथ सोडून भाजपवासी झाले. त्यांच्यासोबत मनसेच्या ५ नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. सोमवारीदेखील महाजन यांच्या नेतृत्वाखाली काही जण भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याची चर्चा सकाळपासून सुरू होती. मात्र, महाजन जळगावात गुप्त ठिकाणी बैठक घेत होते. या वेळी युतीच्या जागावाटपासाठीच या बैठका सुरू असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर तापी पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात मंत्री महाजन आले असता, त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. या वेळी त्यांनी भाजप-शिवसेना युती अद्याप फिस्कटलेली नसून शेवटच्या क्षणापर्यंत युतीची शक्यता असल्याचेही ते म्हणाले. आणखी काहीजण भाजपात येण्यास उत्सुक असल्याचे सांगून भाजपकडे आता जागा नसल्याने त्यांना थांबवावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यालयात गर्दी
जळगाव शिवतीर्थ मैदानासमोरील जीएम फाउंडेशन या महाजन यांच्या संपर्क कार्यालयात सोमवारी दुपारपासून मोठी गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी युतीची घोषणा होर्इल किंवा नवीन पक्षप्रवेश होणार असल्याच्या चर्चेमुळे कार्यकर्ते थांबून होते. रात्री उशिरा खलील पठाण आणि डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी महाजनांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज