अ‍ॅपशहर

खोल डोहात बुडून बालकाचा मृत्यू

जामनेर येथील नगरपालिकेच्या घरकुलातील रहिवाशी असलेल्या आठवर्षीय बालकाचा घराशेजारी असलेल्या नाल्यातील आठ फूट खोल डोहात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी (दि. २९) दुपारी दोन वाजेपासून हा बालक बेपत्ता होता. सायंकाळी साडेपाचला त्याचा मृतदेह आढळला. कलीमखान शरीफखान असे या बालकाचे नाव आहे.

Maharashtra Times 31 Aug 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the child dies drowning in the deep at jamner
खोल डोहात बुडून बालकाचा मृत्यू


जामनेर येथील नगरपालिकेच्या घरकुलातील रहिवाशी असलेल्या आठवर्षीय बालकाचा घराशेजारी असलेल्या नाल्यातील आठ फूट खोल डोहात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी (दि. २९) दुपारी दोन वाजेपासून हा बालक बेपत्ता होता. सायंकाळी साडेपाचला त्याचा मृतदेह आढळला. कलीमखान शरीफखान असे या बालकाचे नाव आहे.

कलीमखान शरीफखान हा इयत्ता दुसरीत शिकणारा बालक पालिकेने दूरध्वनी कार्यालयाजवळ बांधलेल्या घरकुलात वास्तव्याला आहे. मंगळवारी दुपारी दोनला तो इतर मुलांसोबत खेळायला घराबाहेर गेला होता. सायंकाळी पाच वाजेपर्यंतदेखील तो घरी परतला नाही. यामुळे चिंतित झालेल्या त्याच्या पालकांनी त्याची परिसरात शोधाशोध सुरुवात केली.

जामनेर पालिकेचा निष्काळजीपणा नडला

या घरकुलाजवळ मोठा नाला आहे. याठिकाणी पाणी साचून डोह तयार झाला आहे. या डोहात त्याचा मृतदेह आढळून आला. सोमवारी रात्रीपासून जामनेरात पाऊस सुरू आहे. पावसाच्या पाण्यामुळे नाल्यातील हा डोह तुडुंब भरला होता. या घटनेमुळे संपूर्ण जामनेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अनेक दिवसांपासून नाल्यातील या खड्ड्यांच्या सपाटीकरणाची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, पालिका प्रशासनाने याची दखल घेतली नाही. जामनेर नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे या बालकाचा जीव गेला आहे, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. वेळोवेळी सांगूनही खड्डे बुजले न गेल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याची संतप्त भावना बालकाच्या नातेवाइकांकडून व्यक्त केली जात आहे.मृत्यू

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज