अ‍ॅपशहर

वीरजवान मिलिंद यांना अखेरचा सलाम

जम्मू-काश्मीरमधील बंदीपोरामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या हवाई दलाच्या गरूड पथकातील सार्जंट मिलिंद खैरनार यांच्या पार्थिवावर गुरुवारी (दि. १२) सायंकाळी नंदुरबार जिल्ह्यातील बोराळे या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Maharashtra Times 13 Oct 2017, 4:00 am
बोराळेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the last salute to veerajwaan milind khairnar at borale nandurbar
वीरजवान मिलिंद यांना अखेरचा सलाम


म. टा. वृत्तसेवा, धुळे

जम्मू-काश्मीरमधील बंदीपोरामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या हवाई दलाच्या गरूड पथकातील सार्जंट मिलिंद खैरनार यांच्या पार्थिवावर गुरुवारी (दि. १२) सायंकाळी नंदुरबार जिल्ह्यातील बोराळे या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिलिंद यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी हवाईदलाच्या विमानाने नाशिकमधील ओझर विमानतळावर आणण्यात आले. यावेळी शहीद मिलिंद खैरनार यांच्या कुटुंबाने अत्यंत शोकाकुल वातावरणात आपल्या लाडक्याला निरोप दिला. यावेळी प्रशासनातर्फे मानवंदना देऊन लष्कराच्या वाहनाने साक्रीमार्गे नंदुरबारकडे नेण्यात आले. मिलिंद यांचे पार्थिव साक्री शहरात पोहोचल्यानंतर त्याठिकाणी साक्री पोलिस दलाकडून मानवंदना देऊन तहसीलदार संदीप भोसले पोलिस निरीक्षक एस. आर. पाटील यांच्यासह नागरिकांना अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर नंदुरबार तालुक्यातील बोराळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, माजी आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, नायब तहसीलदार जी. एम. पाटील यांच्यासह सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज