अ‍ॅपशहर

प्रशासकीय सेवेच्या स्वप्नाला हवे समाजाचे पाठबळ!

आठवीत असताना उराशी बाळगलेले प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर अभ्यासाशिवाय तरणोपाय नाही हे पक्के माहिती होते. त्यामुळे वडिलांनी तयार केलेल्या अभ्यासिकेतील कागदावर ९८ टक्के लिहून त्याचा ध्यास धरीत संकेत अहिरे याने अभ्यास केला. दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के मिळाल्याने काहीसा निराश असलेला संकेत बारावीत ९८ टक्के मिळवणारच असे सांगतो. संकेतला प्रशासकीय सेवेत जायचे असून, त्यासाठी त्याला समाजाचे आर्थिक बळ हवे आहे.

Maharashtra Times 29 Jun 2018, 5:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम DSC_0825


आठवीत असताना उराशी बाळगलेले प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर अभ्यासाशिवाय तरणोपाय नाही हे पक्के माहिती होते. त्यामुळे वडिलांनी तयार केलेल्या अभ्यासिकेतील कागदावर ९८ टक्के लिहून त्याचा ध्यास धरीत संकेत अहिरे याने अभ्यास केला. दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के मिळाल्याने काहीसा निराश असलेला संकेत बारावीत ९८ टक्के मिळवणारच असे सांगतो. संकेतला प्रशासकीय सेवेत जायचे असून, त्यासाठी त्याला समाजाचे आर्थिक बळ हवे आहे.

संकेतकडे हुशारी आहे. अभ्यासाची तयारी व स्वप्न पूर्ण करण्याची जिद्ददेखील त्याच्यात आहे. मात्र, यासाठी विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा असल्याने त्यासाठी येणाऱ्या खर्चाबाबत त्याला व कुटुंबाला चिंता वाटते. वडिलांचे गिरणा टाकी परिसरात असलेले सलूनच्या दुकानाच्या उत्पन्नातून घराचा गाडा चालतो. वडील दगडू अहिरे व आर्इ सरला अहिरे दोघेही अल्पशिक्षित असले तरी त्यांना मुलाच्या हुशारीचे कौतुक आहे. दुसरा मुलगा हर्षल पाचवीत आहे. त्याचा अभ्यासदेखील संकेतच घेतो.

अगदी पहिलीपासूनच शाळेत पहिल्या पाच येणाऱ्या हुशार मुलांमध्ये येण्यासाठी त्याची सारखी धडपड असायची. अनेकवेळा वडिलांच्या दुकानात जाण्याचे प्रसंग यायचे. वडीलदेखील सलूनचे काम शिकून ठेव म्हणायचे. त्यामुळे तो अभ्यासाव्यतिरिक्त वेळा मिळाला की दुकानात जायचा. तिथे अनेक जण भेटायचे काही अधिकारीदेखील तेथे येत असत. त्यांच्या चर्चा ऐकता ऐकताच संकेतला प्रशासकीय सेवेत जाऊन मोठे अधिकारी व्हावे असे मनावर बिंबत गेले. आठवीतच त्याने आयएएस होण्याचा संकल्प केल्याचे त्याचे वडील दगडू अहिरे हे कौतुकाने सांगतात.

गणितात पैकीच्या पैकी गुण
संकेतने दहावीत स्वत:च्या नोटस काढून दररोज ५ तास याप्रमाणे अभ्यास केला. गणिताची विशेष गोडी संकेतला आहे. त्यास गणितात पैकीच्या पैकी गुण मिळाले. त्याच्या शाळेत वैदिक गणित शिकवण्यासाठी शिक्षकांनी त्याच्यकडे विचारणा केल्याचेही तो सांगतो. चौथीला असताना त्याने स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण केली आहे. शाळेत केवळ अभ्यासच नव्हे तर सांस्कृतिक कार्यक्रमातही संकेत अग्रसेर असतो. प्रशासकीय सेवत जावून आपल्यासारख्या हुशार, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी अशा भावनादेखील त्याने व्यक्त केल्या. प्रशासकीय सेवेत जाण्याचे त्याचे स्वप्न आहे. मात्र, आर्थिक परिस्थितीचा अडसर तर येणार नाही ना? अशी भीती असलेला त्याचा प्रश्नार्थक चेहरा मन हेलावून टाकतो. त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला आर्थिक पाठबळ हवे आहे.

चेक पाठविण्यासाठी पत्ता :

१२, बळीराम पेठ, साने गुरुजी चौक, अॅक्सिस बँक एटीएमच्यावर, एम. जी. रोड, जळगाव ४२५००१

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज