अ‍ॅपशहर

ट्रक थोडक्यात बचावला

मेहुणबारे येथील गिरणा पुलावरून ट्रक नदीपात्रात कोसळताना बचावला. पुलाच्या कठड्यावरच हा ट्रक अडकून दोन्ही बाजूने अधांतरी राहिला. पुलावरील खड्ड्यात ट्रकचे पुढचे चाक जोरात आदळल्याने ट्रकचा स्टेरिंग रॉड जाम झाला. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.

Maharashtra Times 26 Aug 2018, 5:00 am
गिरणा पुलावरून ६५ फ्रीजचा ट्रक नदीपात्रात कोसळताना बचावला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chalisgaon truck


म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

मेहुणबारे येथील गिरणा पुलावरून ट्रक नदीपात्रात कोसळताना बचावला. पुलाच्या कठड्यावरच हा ट्रक अडकून दोन्ही बाजूने अधांतरी राहिला. पुलावरील खड्ड्यात ट्रकचे पुढचे चाक जोरात आदळल्याने ट्रकचा स्टेरिंग रॉड जाम झाला. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.

गिरणा नदीवरील पूलावरून शनिवारी (दि. २५) पहाटे तीन वाजता ट्रक (क्रमांक एम. एच. २० सीटी ४७१७) औरंगाबादहून नंदुरबारला जात होता. ट्रकमध्ये ६५ नवे फ्रीज होते. पुलावरील भल्यामोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने ट्रकचे पुढचे चाक आदळून ट्रकचे स्टेरिंग रॉड जाम झाला. यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ट्रक थेट कठड्यांवर धडकला. सुदैवाने तेथेच तो अडकल्याने नदीपात्रात ५० फूट कोसळताना बचावला. ट्रकचालक जर्नादन बाबुराव पवार (वय ३८, रा. औरंगाबाद) यांच्या जीव वाचला असून, नशीब बलवत्तर असल्यानेच ही दुर्घटना टळली. दुसऱ्या गाडीवरील चालकाने जर्नादन यास ट्रकच्या केबीनच्या बाहेर काढले. यानंतर दोन क्रेनच्या सहाय्याने सकाळी ९ वाजता ट्रक बाहेर काढण्यात आला. त्यावेळी काहीवेळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. या प्ररकणी मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप शिरसाठ, पोलिस कॉन्स्टेबल भालचंद्र पाटील, रमेश पाटील, गोरख चकोर, योगेश बोडखे, मच्छिंद्र तारडे, दीपक पाटील, अन्वर तडवी, भटू पाटील यांनी वाहतूक सुरळीत केली.

पुलाची दुरुस्ती केव्हा?
हा पूल दिवसेंदिवस धोकादायक होत असून, तीन महिन्यांपूर्वी कठडे तोडून एक ट्रक नदीपात्रात कोसळल्याने चालकाचा मृत्यू झाला होता.
चाळीसगाव ते धुळे या रस्त्यावर मेहुणबारे येथील गिरणा नदीपात्रावरील २१९ मिटर लांबीचा पुलाला ९ गाळे असून, १९६८ मध्ये पुलाचे बांधकाम झाले आहे. पुलावर चार ते पाच मोठे खड्डे पडले आहेत. तसेच दोन्ही बाजूचे कठडे नादुरुस्त आहेत. कठड्यांची दुरुस्ती झाली परंतु, काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने कठड्यांची जैसे थे परिस्थिती झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज