अ‍ॅपशहर

प्लास्टिक बंदी रद्द करावी

राज्य सरकारने अचानक प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर केला असून, त्यामुळे प्लास्टिक उद्योगाशी निगडित हजारो उद्योजक, लाखो वितरक व कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. सरकार व बँकांचेदेखील आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता असल्याने सरकारने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी जिल्हा प्लास्टिक असोसिएशनतर्फे करण्यात आली. बुधवारी (दि. २८) असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.

Maharashtra Times 29 Mar 2018, 4:00 am
व्यापारी असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम to cancelled plastic banned action shoppers request letter to jalgaon district collector
प्लास्टिक बंदी रद्द करावी

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

राज्य सरकारने अचानक प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर केला असून, त्यामुळे प्लास्टिक उद्योगाशी निगडित हजारो उद्योजक, लाखो वितरक व कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. सरकार व बँकांचेदेखील आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता असल्याने सरकारने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी जिल्हा प्लास्टिक असोसिएशनतर्फे करण्यात आली. बुधवारी (दि. २८) असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.

प्लास्टिक बंदीमुळे लाखो व्यावसायिक व कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार आहे. यावर अवलंबून लहान-मोठे व्यवसाय, उद्योग करणाऱ्यांनाही त्याची झळ सोसावी लागणार आहे. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सर्व उद्योजक काही बाबींमध्ये प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचे स्वागत करतात. परंतु, अचानक घेतलेला हा निर्णय पूर्णतः अयोग्य असून, त्यामुळे उद्योजकांवर आत्महत्येची वेळ येऊन ठेपली आहे. तरी हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशा आशयाचे निवेदन व्यापाऱ्यांनी दिले आहे. या वेळी जिल्हा प्लास्टिक असोसिएशनचे किरण राणे, सुभाष तोतला, अमीत भुतडा, नितीन तोतला, विनय खानचंदानी, रमेश माधवानी, पराग लुंकड आदी उपस्थित होते. जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असून, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी असोसिएशनला काही कालावधी देण्यात यावा, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज