अ‍ॅपशहर

मुस्लिमबहुल भागात साफसफाई करा

रमजान निमित्त शहरातील मुस्लिमबहुल भागात साफसफाई व बंद दिवे सुरू करण्याची मागणी एआयएमआयएमतर्फे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Maharashtra Times 17 May 2018, 4:00 am
रमजानच्या पार्श्वभूमीवर एमआयएमची मागणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम to cleaning in muslim community areas in jalgaon demands aimim to municipal corporation
मुस्लिमबहुल भागात साफसफाई करा


म.टा. प्रतिनिधी, जळगाव

रमजान निमित्त शहरातील मुस्लिमबहुल भागात साफसफाई व बंद दिवे सुरू करण्याची मागणी एआयएमआयएमतर्फे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना बुधवार (दि. १६) पासून सुरू झाला आहे. या महिन्यात सकाळी सूर्योदयाअगोदर व सूर्यास्तानंतर मशिदीत नमाजपठण करण्यासाठी मुले व वयोवृद्ध व्यक्ती मशिदीत जात असतात. मात्र, शहरातील अनेक मुस्लिमबहुल भागातील पथदिवे बंद आहेत तसेच रस्त्याच्या कडेला घाण पडलेली असते. यामुळे रोजेदारांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे मुस्लिमबहुल भागातील सर्व पथदिवे सुरू करण्यात येऊन या महिन्यात दररोज साफसफाई व मशिदीत रोज शेकडो लोक इफ्तार (रोजा सोडण्यास) येतात म्हणून मशिदीजवळ एक घंटागाडी उभी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर महानराध्यक्ष रैय्यान जहागीरदार यांची स्वाक्षरी आहे.

मान्सूनपूर्व कामांना सुरुवात
उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग, नगररचना, आपत्कालीन विभाग, प्रभाग अधिकाऱ्यांना नालेसफाई, तेथील अतिक्रमण काढणे, सफाई, शहरातील गटारी, डक, सेप्टी टँक आदी स्वच्छता मोहीम राबविणे, पडक्‍या इमारती, धोकादायक झाडे, मोडकळीस आलेले होर्डिंग आदी सर्वेक्षण करून कारवाई करणे. तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्‌भविल्यास यंत्रणा २४ सुरू ठेवण्याचे, प्रशिक्षण तसेच लागणारे साहित्य चालूस्थितीत ठेवण्याचे आदेश संबंधित विभाग प्रमुखांना आदेश दिलेले आहेत. याबाबत हलगर्जी झाल्यास कारवाई केली जाईल, असेही आदेश देण्यात आलेले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज