अ‍ॅपशहर

कामगारांचे प्रश्न सोडवा

सरकारकडून विविध क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. केंद्र व राज्य सरकारने कामगारांच्या प्रश्नात लक्ष देत प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा कामगार विषयीच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी भारतीय मजदूर संघाकडून राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर बाणासुरे यांनी दिला.

Maharashtra Times 25 Jul 2017, 1:52 am
कामगार मेळाव्यात भारतीय मजदूर संघाची मागणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम to solve labours problems demands by indian labour orgnization
कामगारांचे प्रश्न सोडवा


म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

सरकारकडून विविध क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. केंद्र व राज्य सरकारने कामगारांच्या प्रश्नात लक्ष देत प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा कामगार विषयीच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी भारतीय मजदूर संघाकडून राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर बाणासुरे यांनी दिला.

ते रविवारी (दि. २३) शहरातील आण्णासाहेब साठे सभागृहात संघटनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित संघटित व असंघटित कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते. मेळाव्यात व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष बाणासुरे यांच्यासह आमदारांचे प्रतिनिधी म्हणुन विश्वास चव्हाण, सरचिटणीस सदाशिव सोनार, जिल्हा चिटणीस किरण पाटील, प्रवीण अमृतकार, सोनाली लोखंडे, दीपा बिसावा, कमलाबाई मेटकर आदी उपस्थित होते. मेळाव्याच्या सुरुवातीस सदाशिव सोनार यांनी कामगारांच्या समस्यांविषयी विचार विनीमय करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगत सरकारने कामगारांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली.

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाणासुरे यांनी आपल्या मनोगतात कामगारांच्या विविध समस्या मांडल्या. पूर्वीच्या सरकारने कामगारांच्या समस्यांकडे लक्ष दिले नाही. म्हणून त्यांना कामगारांनी घरी पाठविल्याचे सांगत मोठ्या अपेक्षेने कामगारांनी केंद्र व राज्य सरकारला निवडून दिले आहेत.

कामगारांचे प्रश्न मोठे असून, सरकारने घरेलू कामगारांना न्याय द्यावा. चाळीसगावच्या आमदारांना कामगारांच्या प्रश्नांची जाणीव आहे. त्यांनी घरेलू कामगारांचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यांनी घरेलू कामगारांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करावा, अशी मागणीदेखील बाणासुरेंनी केली.

मेळाव्यास उपस्थित विश्वास चव्हाण यांनी आमदार उन्मेष पाटील यांचा घरेलू कामगारांच्या प्रश्नांसाठी सरकारदरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत त्यांनी घरेलू कामगारांचा प्रश्न मांडला आहे, असे सांगितले. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठकदेखील बोलावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांच्या कालावधीत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली १ कोटी उपदानाची व भविष्यनिधीची रक्कम आमदारांच्या पुढाकाराने देण्यात आल्याचेही ते म्हणाले. मेळाव्यास तालुक्यातील घरेलू, बांधकाम, रिक्षाचालक, नगरपालिका कर्मचारी तसेच महिला व पुरूष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज