अ‍ॅपशहर

महामार्गावर दीड तास वाहतूक कोंडी

शहरातील अजिंठा चौकात बेशिस्तपणे वाहन काढल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शनिवारी (दि. १८) दुपारी साडेबारा वाजता झालेल्या या कोंडीमुळे वाहनधारकांना मनस्ताप झाला. वाहतूक शाखा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी दीड तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Maharashtra Times 19 Feb 2017, 4:00 am
बेशिस्त वाहनधारकांमुळे मनस्ताप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic jam issue at jalgaon
महामार्गावर दीड तास वाहतूक कोंडी

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरातील अजिंठा चौकात बेशिस्तपणे वाहन काढल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शनिवारी (दि. १८) दुपारी साडेबारा वाजता झालेल्या या कोंडीमुळे वाहनधारकांना मनस्ताप झाला. वाहतूक शाखा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी दीड तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

शनिवार, हा जळगावच्या बाजाराचा दिवस असल्याने महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू होती. दुपारी बारा वाजून वीस मिनीटांनी येथे वाहतुकीचा बोजवारा झाला. अजिंठा चौफुलीपासून थेट कालींका माता मंदिरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. तर अजिंठा चौफुलीपासून ईच्छादेवी मंदिरापर्यंत अवजड वाहनांसह अन्य वाहनांच्या रांगा लागल्या. जामनेर रोडवर हॉटेल काशिनाथपर्यंत वाहनांची रांग लागली तर शहरातील नेरी चौफुलीजवळच्या स्मशानभूमीपर्यंत वाहनांची रांग लागली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज