अ‍ॅपशहर

वाहतूक शाखेकडून ५० रिक्षांवर कारवाई

शहर वाहतूक पोलिस शाखेतर्फे मंगळवारी (दि. २१) कागदपत्रे पूर्ण नसलेले तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५० रिक्षांवर कारवाई करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून १०,३०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

Maharashtra Times 22 Mar 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic police department actionon 50 rickshaw at jalgaon
वाहतूक शाखेकडून ५० रिक्षांवर कारवाई

शहर वाहतूक पोलिस शाखेतर्फे मंगळवारी (दि. २१) कागदपत्रे पूर्ण नसलेले तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५० रिक्षांवर कारवाई करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून १०,३०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

पोलिस मंगलम हॉल, पोलिस मुख्यालय येथे पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या अध्यक्षतेखाली ४ मार्च रोजी रिक्षा चालक-मालक संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातील सूचनेप्रमाणे शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील परवानाधारक रिक्षांच्या कागदपत्रांची तपासणीस सुरुवात करण्यात आली. कागदपत्रे पूर्ण अशा ३५० रिक्षांवर विशेष स्टिकर्स लावण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज