अ‍ॅपशहर

वादळी पावसामुळे झाडांची पडझड

जळगाव शहराला बुधवारी दुपारी अचानक आलेल्या वादळाने जोरदार तडाखा दिला. वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे शहरातील वृक्षांसह अनेक भागा‌त‌ मोठी पडझड झाली. बजरंग बोगदा अवघ्या १५ मिनिटांत पाण्याने भरून वाहतूक ठप्प झाली.

Maharashtra Times 20 Sep 2018, 5:00 am
शहरातील निम्म्या भागांत वीजपुरवठा ठप्प
महाराष्ट्र टाइम्स.कॉम DSC_9504


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव शहराला बुधवारी दुपारी अचानक आलेल्या वादळाने जोरदार तडाखा दिला. वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे शहरातील वृक्षांसह अनेक भागा‌त‌ मोठी पडझड झाली. बजरंग बोगदा अवघ्या १५ मिनिटांत पाण्याने भरून वाहतूक ठप्प झाली.

शहरात बुधवारी सकाळपासूनच सामान्य वातावरण होते. मधूनमधून वारेदेखील सुरूच होते. दुपारी वातवरणात अचानक बदल झाला. दुपारी चार वाजेपासून पासून वादळी वाऱ्यांसह पावसाने शहर चिंब केले. पावसाच्या जोरापेक्षा वादळी वाऱ्यांचा जोर जास्त असल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली. यामुळे शहरातील निम्म्या भागांत वीजपुरवठादेखील खंडित करण्यात आला होता. शहरातील सखल भागात पाणी साचले तर नुकत्याच बांधलेल्या बजरंग बोगदा पाण्याने पूर्ण भरला.

वृक्ष उन्मळून पडले
वादळी वाऱ्यांमुळे शहरातील अनेक भागात जीर्ण वृक्ष उन्मळून पडल्याने मनपाचे आपात्कालीन पथक तिकडे रवाना झाले होते. गणेशमंडळांचे अनेक ठिकाणी मंडपदेखील निखळले. कोर्टाच्या आवरात वृक्ष उन्मळून दोन मोटारसायकलींचे नुकसान झाले. खंडेराव नगरातही वृक्ष पडून पोल वाकल्याची घटना घडली. या वादळी वाऱ्यांमुळे अनेक भागात विजेच्या तारा तुटून फिडर ट्रीप झाले होते. तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळल्याने तरा तुटल्या होत्या. आशाबाबा नगर आर. एम. एस कॉलनीत रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज