अ‍ॅपशहर

विद्यार्थ्यांचा एल्गार!

तीन महिन्यापूर्वीच नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. अद्यापही आदिवासी विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेशाचा मार्ग मोकळा झालेला नाही. पहिल्या सेमिस्टर परीक्षेला सुरुवात होवूनही विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था न झाल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

Maharashtra Times 5 Oct 2017, 4:00 am
एकता परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tribal students andolan for hostel issue at jalgaon collector office
विद्यार्थ्यांचा एल्गार!


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

तीन महिन्यापूर्वीच नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. अद्यापही आदिवासी विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेशाचा मार्ग मोकळा झालेला नाही. पहिल्या सेमिस्टर परीक्षेला सुरुवात होवूनही विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था न झाल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ अडचणी प्रवेश द्यावे या मागणीसाठी बुधवारी (दि. ४) आदिवासी एकता परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी बुधवारी (दि. ४) मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे याठिकाणी आले. त्यांच्यापुढे विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या अडचणींचा पाढा वाचला. विद्यार्थ्यांच्या समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी करण्यात आली. प्रकल्पाधिकारी हिवाळेंनी विद्यार्थ्यांची समजूत काढत वसतिगृहाच्या प्रवेशासह इतरही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

मोर्चात आदिवासी एकता विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष रुपसिंग वसावे, उपाध्यक्ष विलास तडवी, जयसिंग पराडके, सारसिंग वळवी, राजेश पावरा, सुनील वळवी, प्रितम वळवी, अशोक पावरा आदींसह आदिवासी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मोर्चात सहभाग घेतला होता. यापूर्वी २८ ऑगस्ट रोजी प्रकल्प अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी त्यांनी मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही मागण्या मान्य न केल्याने पुन्हा मोर्चा काढला.

अशा आहेत मागण्या

सरकार आदिवासी विद्यार्थी कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे. मात्र सरकारच्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. शासन पुरवत असलेल्या सेवा सुविधांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली. पंडित दीनदयाल उपाधार योजनेतील पात्र विद्यार्थ्यांची यादी तत्काळ जाहीर करण्यात यावी, शिव कॉलनीच्या वसतिगृहातील उर्वरित विद्यार्थ्यांना तत्काळ नवीन इमारतीची सोय करून देण्यात यावी या मागण्या आदिवासी विद्यार्थ्यांनी केल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज