अ‍ॅपशहर

‘देवाची साथ असल्याने आंदोलन यशस्वी’

महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळावा यासाठी महिलांच्या मदतीने आंदोलन छेडले त्यावेळी टोकाचा विरोध झाला, हल्ले झाले मात्र चांगल्यालाही देवाची साथ असते. म्हणूनच सर्व आंदोलने यशस्वी झालीत अशा शब्दात भूमाता रणरागिणी बिग्रेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

Maharashtra Times 5 Mar 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम trupti desai at jalgaon for womens rally
‘देवाची साथ असल्याने आंदोलन यशस्वी’

महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळावा यासाठी महिलांच्या मदतीने आंदोलन छेडले त्यावेळी टोकाचा विरोध झाला, हल्ले झाले मात्र चांगल्यालाही देवाची साथ असते. म्हणूनच सर्व आंदोलने यशस्वी झालीत अशा शब्दात भूमाता रणरागिणी बिग्रेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

जळगाव जिल्हा महिला असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित प्रकट मुलाखतीप्रसंगी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील व अस्मिता गुरव यांनी तृप्ती देसाईंची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी त्याचे मूळ गाव ते आंदोलनापर्यंतचा प्रवास उलगडला.

महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याला आल्यानंतर समाजासाठी लढा सुरू केला. कॉलेजला असतांना जेथे आंदोलन दिसले त्या आंदोलनात सहभागी व्हायची असे देसाई यांनी सांगितले. शनि शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, हाजी अली आदींसाठी आंदोलने केली त्यावेळी अनेक धमक्या मिळाल्या. महिला कधीही कमजोर नसते ही भावना मनात ठेवूनच मी कधीही माघार घेतली नाही. प्रत्येकवेळी संघर्ष केला त्यातून यशही मिळाले.

जिल्हा महिला असोसिएशनतर्फे प्रकट मुलाखतीआधी शहरातील महिला मंडळांची रॅली काढण्यात आली होती. जी. एस. ग्राऊंडपासून तर गंधे सभागृहापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत महिला ढोल पथक हे महत्त्वाचे आकर्षण होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज