अ‍ॅपशहर

जळगावः बोरी नदीत बुडून दोघांचा मृत्यू

अमळनेर तालुक्यातील हिंगोणे शिवारातील बोरी नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. दानिश शेख अरमान (वय १६) व शाहिदखा रहेमानखा मेवाती (वय १७) या दोन्ही युवकांचा यात समावेश आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Sep 2019, 8:58 pm
जळगावः अमळनेर तालुक्यातील हिंगोणे शिवारातील बोरी नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. दानिश शेख अरमान (वय १६) व शाहिदखा रहेमानखा मेवाती (वय १७) या दोन्ही युवकांचा यात समावेश आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम drown


दानिश शेख अरमान याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शाहीदखा मेवाती याचा नदीत शोध सुरू आहे. कसाली भागातील सुमारे आठ ते दहा युवक बहादरपूर रस्त्यावरील हिंगोणे शिवारातील बोरी नदीत पोहण्यास गेले होते. पोहत असताना दानिश शेख अरमान यांचा ३० फूट खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे पाहून त्याला वाचविण्यासाठी गेलेला शाहिदखा रहेमानखा मेवाती याचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना पाहून भेदरल्याने उर्वरीत सहा ते सात युवक तेथून निघून गेले. परिसरातील भील नामक या तरुणाने दानिश शेख अरमानचा मृतदेह बाहेर काढला. मात्र, दुसरा मृतदेह त्याला मिळून आला नाही. पालिकेचे अग्निशमनचे पथक लाइफ जॅकेट व यंत्रसामग्री घेऊन तेथे दाखल झाले. काही पट्टीचे पोहणारे तरूण, पालिकेचे कर्मचारी व पोलिसांच्या पथकाकडून दुसऱ्या युवकाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज