अ‍ॅपशहर

उद्धव ठाकरे समर्थक, शिंदे गटाचे कार्यकर्ते अन् भाजपचे मंत्री आले एकत्र; जळगावात नेमकं काय घडलं?

Bjp Girish Mahajan : राज्यात राजकीय संघर्ष सुरू असतानाच जळगावमध्ये तिन्ही गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र दिसून आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Oct 2022, 11:28 pm
जळगाव : राज्यात सद्यस्थितीत शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा आणि कोणाच्या दसऱ्या मेळाव्याला सर्वाधिक गर्दी जमली यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे हिंदुत्वाचे विचार नेमके कोणाचे यावरुन भाजप-शिवसेनेमध्ये चढाओढ लागली असल्याचे दिसून येत आहे. असं असताना जळगावात मात्र उद्धव ठाकरे गट, शिंदे गट व भाजपचे नेते एकत्र आल्याचे दिसून आले. निमित्त होते बालाजी रथाचे. एकीकडे राज्यात राजकीय संघर्ष सुरू असतानाच जळगावमध्ये तिन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र दिसून आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon shivsena bjp news 1
जळगाव शिवसेना


धरणगावातील बालाजी रथाची तब्बल १२५ पेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. बालाजी वहनोत्सव मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही बालाजी रथोत्सव साजरा झाला. या रथोत्सवासाठी भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन, भाजपचे विधान परिषद आमदार चंदूलाल पटेल, भाजपचे खासदार उन्मेश पाटील, शिवसेनेचे उद्धव ठाकरे समर्थक सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, धरणगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी तसंच शिंदे गटाचे पदाधिकारी भानुदास विसावे आणि इथर कार्यकर्तेही उपस्थित होते.

मंत्रिपद कायम राहण्यासाठी येड्यासारखी बडबड, प्रकाश आंबेडकरांनी जनसमुदायाच्या साक्षीनं आठवलेंना फटकारलं

बालाजी रथ हा ट्रॅक्टरला जोडून या ट्रॅक्टरची स्टेअरिंग मंत्री गिरीश महाजनांनी हातात घेतले. यावेळी ट्रॅक्टरवर भाजप खासदार उन्मेश पाटील यांच्यासमवेत उद्धव ठाकरे गटाचे निलेश चौधरी हे बसलेले होते. महाजन हे बालाजी रथ असलेला ट्रॅक्टर चालवताना दिसून आले. या बालाजी रथोत्सवाच्या निमित्ताने पक्षभेद, मतभेद विसरून उद्धव ठाकरे गट व शिंदे गटाचे कार्यकर्ते तसंच भाजपचे पदाधिकारी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज